G20 New Delhi Summit : आगामी G20 शिखर परिषद २०२६ साली; अमेरिकेकडे यजमानपद !

Narendra Modi Meet Jo Biden : "जागतिक अर्थव्यवस्था हवामान संकट, युद्ध अशा समस्यांनी ग्रासलेले आहे."
G-20 New Delhi Summit
G-20 New Delhi SummitSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : राजधानी दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या G20 शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रविवारी या शिखर परिषदेचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, या पुढची G20 शिखर परिषद २०२६ मध्ये होणार असून, त्याचे यजमानपद अमेरिकेकडे असणार आहे. शनिवारी व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दिल्लीतील जी २० शिखर परिषदेप्रमाणेच या परिषदेत सर्व गंभीर समस्यांवर तोडगा काढण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. (Latest Marathi News)

G-20 New Delhi Summit
Maratha Vs OBC Community : राज्यात मराठा-ओबीसीत आरक्षणावरून ठिणगी ? ओबीसी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

२०२६ साली होणाऱ्या शिखर परिषदेचे यजमानपद अमेरिकेकडे असणार असल्याची घोषणा दिल्लीत करण्यात आली. या घोषणेनंतर लगेचच व्हाईट हाऊसच्या एका निवेदनात म्हटले आहे की, "ज्या क्षणी जागतिक अर्थव्यवस्था हवामान संकट, युद्ध अशा समस्यांनी ग्रासलेले आहे. युक्रेनमधील रशियाच्या युद्धामुळे जगावरच प्रचंड परिणाम घडून आले. मात्र, नवी दिल्लीत झालेली शिखर परिषद सर्व भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करू शकते, हे सिद्ध केले आहे."

G-20 New Delhi Summit
MLA Disqualification News : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत तारीख अन् वेळ ठरली; एकाच दिवशी होणार सुनावणी

दिल्लीतील जी20 शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेला जगामध्ये नेतृत्वाची भूमिका बहाल करण्याचे वचन दिले आहे. परदेशात संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि देश-विदेशातील आर्थिक अजेंडाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या वचनबद्धतेची पूर्तता करणे सुरूच ठेवले आहे. आगामी काळात हाेत असलेल्या G20 परिषदेसाठी आम्ही वचनबद्ध असून, भारताच्या G20 परिषदेतील अध्यक्षतेखाली झालेल्या प्रगतीची उभारणी करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे, व्हाईट हाऊसच्या एका निवेदनात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com