केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल : पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याचा समावेश होणार; शिंदे गटालाही संधी

शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद किंवा एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपद भाजपकडून दिले जाणार असल्याची माहिती आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंंडळात (Union Cabinet) लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. यात काही मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या लोकांना संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) काही मंत्र्यांना वगळून त्यांच्या ठिकाणी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक खासदारास मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटालाही फेरबदलामध्ये समाविष्ठ करून घेतले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. (There will be a reshuffle in the Union Cabinet soon)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ७७ मंत्र्यांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनात या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याची माहिती आहे. निष्क्रीय मंत्र्यांना नारळ देऊन निवडणुकीत विजय मिळवून देणाऱ्या खासदारांचा नव्या फेरबदलामध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या फेरबदलात महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Narendra Modi
खडसे-शहांच्या भेटीच्या चर्चेत नवा ट्विस्ट; आता पवारांच्या उपस्थितीत खडसे शहांना भेटणार!

फेरबदलात केंद्रीय मंत्रिमंडळात विदर्भाला मंत्रिपद मिळणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. तो पुन्हा बसू नये, यासाठी ही रणनीती असणार आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचाही नव्या फेरबदलात समावेश होणार आहे. शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद किंवा एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपद भाजपकडून दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Narendra Modi
खासदार नवनीत राणांविरोधात दुसऱ्यांदा अजामीनपात्र अटक वॉरंट

दरम्यान, ज्या मंत्र्यांची संपत्ती मंत्रिपद मिळाल्यानंतर वाढली आहे, त्याची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळाल्यानंतर ज्यांची संपत्ती वाढली, अशा मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे. तसेच, ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही, अशा मंत्र्यांचीही या फेरबदलात गच्छंती होणार असल्याचे वृत्त ‘साम टीव्ही’ने दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com