मोदींचा सभांचा धडाका अन् कोरोनाची तिसरी लाट आल्याची भाजपच्या मुख्यमंत्र्यांचीच घोषणा

रविवारीही पंतप्रधान मोदींच्या मेरठ येथे झालेल्या कार्यक्रमात मोठी गर्दी झाली होती.
Narendra Modi rally in Varanasi.

Narendra Modi rally in Varanasi.

Sarkarnama

नवी दिल्ली : पुढील एक-दोन महिन्यांत उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) देशातील पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होणार आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून देशभरात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पण अशा स्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उत्तर प्रदेशात मोठ्या सभा सुरू आहेत. त्यावर अनेकांनी टीकाही केली आहेत. आता शेजारील राज्य असलेल्या मध्य प्रदेशाच्या (Madhya Pradesh) मुख्यमंत्र्यांनीच कोरोनाची तिसरी लाट आल्याची घोषणा करत नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले.

मध्य प्रदेशमध्ये भाजपची (BJP) सत्ता असून शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र, केरळ, दिल्ली आदी राज्यांच्या तुलनेत मध्य प्रदेशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. पण त्यानंतर चौहान यांनी सतर्क राहण्याचे सुचना दिल्या आहेत. दुसरी लाट येण्यापूर्वीही देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारसभा झाल्या होत्या. आताही तीच भीती व्यक्त केली जात आहे.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi rally in Varanasi.</p></div>
आमदार सावंत अन् संभाजीराजेंची खलबतं; मोठ्या निर्णयाच्या शक्यतेनं चर्चेला उधाण

केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृतपणे देशात तिसरी लाट आल्याचे सांगितले नाही. पण कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता चौहान यांनीच तिसरी लाट आल्याचे जाहीर केले आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट आली आहे. लोकसहभाग आणि सहकार्यातून कोरोना महामारीशी लढणे गरजेचे आहे. त्याशिवाय ही लढाई शक्य नाही. सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. पण खूप दक्षता घ्यावी लागणार असल्याचे चौहान यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, मध्य प्रदेशच्या शेजारील राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात मात्र मागील काही दिवसांत पंतप्रधान मोदींचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. यामध्ये नागरिकांची मोठी गर्दीही पाहायला मिळाली आहे. रविवारीही मेरठमध्ये झालेल्या कार्यक्रमात मोठी गर्दी जमली होती. या कार्यक्रमांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालनही केले जात नाही. त्यामुळे अनेकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केले जात आहे. पण दुसरीकडे पंतप्रधान मोदींसह इतर पक्षाच्या नेत्यांच्याही उत्तर प्रदेश, पंजाबसह इतर राज्यांतही मोठ्या सभा होत आहेत. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आलेली आहे.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi rally in Varanasi.</p></div>
धक्कादायक : एकाच शाळेतील 85 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

दरम्यान, उत्तराखंडमधील नैनीताल (Nainital) जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील 85 विद्यार्थी एकाचवेळी कोरोनाबाधित आढळले आहेत. या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वसतिगृहात विलग करण्यात आले आहे. सुरूवातीला या शाळेतील 11 विद्यार्थी कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे एकूण 488 विद्यार्थ्याचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल आल्यानंतर एकूण 85 विद्यार्थी बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

शाळेत 30 डिसेंबर रोजी करण्यात आलेले चाचणीत मुख्याध्यापकांसह आठ विद्यार्थी व इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. अद्याप काही विद्यार्थ्यांचे अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे बाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांपैकी 70 टक्के विद्यार्थ्यांना ताप, खोकला, सर्दी आदी लक्षणे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com