Who is K.V. Vishwanathan: कोण आहेत के.व्ही. विश्वनाथन?

K.V. Vishwanathan News | भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन नवीन न्यायाधीशांना आज (१९ मे) पदाची शपथ दिली.
Who is K.V. Vishwanathan:
Who is K.V. Vishwanathan: Sarkarnama

Next Chief Justices of India: भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन नवीन न्यायाधीशांना आज (१९ मे) पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा आणि ज्येष्ठ विधिज्ञ के.व्ही.विश्वनाथन यांचा शपथविधी पार पडला.

Who is K.V. Vishwanathan:
Supreme Court Judge: सर्वोच्च न्यायालयात दोन नव्या न्यायाधिशांची नियुक्ती; सीजेआय' चंद्रचूड यांनी दिली शपथ

विशेष म्हणजे, न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन हे 11 ऑगस्ट 2030 रोजी न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला यांच्या निवृत्तीनंतर भारताचे सरन्यायाधीश होणार आहेत. तर 25 मे 2031 पर्यंत ते सरन्यायाधीश पदावर कार्यरत राहणार आहेत. पण के. व्ही.विश्वनाथन यांचा सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवासही तितकाच कठीण आहे. (Supreme Court News)

के.व्ही. विश्वनाथन यांचा जन्म 26 मे 1966 रोजी झाला. विश्वनाथन यांनी भरथियार विद्यापीठ कोईम्बतूर येथून कायद्याची पदवी पूर्ण केली. 1988 मध्ये त्यांनी तामिळनाडूच्या बार कौन्सिलमध्ये प्रवेश घेतला. दोन दशकांहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात काम केल्यानंतर 2009 मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. (CJI Dhananjay Chandrachud)

Who is K.V. Vishwanathan:
Supreme Court News : सत्तासंघर्षावरील निकाल देणाऱ्या खंडपीठातील न्यायमूर्तींची मोठी घोषणा; म्हणाले...

1988 मध्ये तामिळनाडूतून दिल्लीत आलेल्या के.व्ही. विश्वनाथन यांनी आरके पुरममधील एका खोलीतून सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली, ते 2030 मध्ये देशाचे सरन्यायाधीशही होतील. सीजेआय बनणारे ते तिसरे तमिळ व्यक्ती आहेत. तर बारमधून देशाचे सरन्यायाधीश होणारे चौथे. (Supreme Court Latest news Update)

न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन हे तामिळनाडूचे असून ते 57 वर्षांचे आहेत. तामिळनाडूतील कोईम्बतूरजवळील पोल्लाची येथील ते रहिवासी आहे. त्यांचे सर्व शालेय शिक्षण पोल्लाची आरोग्यमाता मॅट्रिक्युलेशन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर अमरावती सैनिक शाळेत आणि नंतर उथगाई सुसैयप्पर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. कोईम्बतूर लॉ कॉलेजमध्ये पाच वर्षांचा कायद्याचा अभ्यास केला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com