भाजपला मोठा धक्का! अधिवेशन काळासाठी तीन आमदारांचं निलंबन

विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असून, सरकार आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांत जोरदार खडाजंगी सुरू आहे.
Three BJP MLA suspended from Telangana Assembly Session
Three BJP MLA suspended from Telangana Assembly SessionSarkarnama

हैदराबाद : विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असून, सरकार आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांत जोरदार खडाजंगी सुरू आहे. अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या 3 आमदारांना निलंबित करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यानंतर काँग्रेस सदस्यांनी सभागृहात निषेध नोंदवत थेट सभात्याग केला. यावरुन आता आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

तेलंगणच्या (Telangana) विधानसभेचे अधिवेशन (Assembly Session) सुरू आहे. या अधिवेशनात अर्थमंत्री टी.हरीश राव हे आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) मांडत होते. त्यावेळी भाजपच्या (BJP) सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. ते अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्प मांडू देत नव्हते. यामुळे अर्थमंत्र्यांनी काही वेळ अर्थसंकल्पीय भाषण थांबवले. यानंतर पशुसंवर्धन राज्यमंत्री तलासनी श्रीनिवास रेड्डी यांनी या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. अखेर विधानसभा अध्यक्षांनी या अधिवेशन काळासाठी भाजपच्या तीन आमदारांना निलंबित केले. यात टी.राजासिंह, ए.रघुनंदन राव आणि एटला राजेंदर या तीन आमदारांचा समावेश आहे.

Three BJP MLA suspended from Telangana Assembly Session
शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांचा पाय खोलात; सीबीआय कोठडीची हवा खावी लागली

काँग्रेसचा सभात्याग

काँग्रेसने (Congress) आज विधानसभा अध्यक्षांचा निषेध करीत सभात्याग केला. अध्यक्ष हे एकाधिकारशाहीने सभागृह चालवत असून, सदस्यांचा अपमान करीत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या सदस्यांना म्हणणे मांडू देण्यात आले नाही. राज्यघटनेने सदस्यांना दिलेल्या अधिकारांची ही पायमल्ली आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

Three BJP MLA suspended from Telangana Assembly Session
काही दिवस गप्प बसा, तुम्हाला राष्ट्रपती करतो! खुद्द राज्यपालांनीच ऑफर केली उघड

अर्थसंकल्प मांडण्याआधी अर्थमंत्री पोचले पेहम्मा मंदिरात

अर्थमंत्री हरीश राव हे आज अर्थसंकल्प मांडण्यासाठी विधानसभेत जाण्याआधी हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील पेदम्मा मंदिरात पोचले. मंदिरात दर्शन घेऊन ते विधानसभेकडे रवाना झाले. यानंतर त्यांनी अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद घेऊन ते विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यासाठी पोजले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com