Assembly Election : शिंदे, दादांचा सुपडा साफ होणार? भाजपचा अंतर्गत सर्व्हे रोहित पवारांनी फोडला...

Rohit Pawar Mahayuti BJP NCP Shiv Sena : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा दणका बसला. महाविकास आघाडीने अनपेक्षितपणे मोठा विजय मिळवला होता.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवाद काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचा अंतर्गत सर्व्हे फोडला आहे. या सर्व्हेनुसार, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुपडा साफ होणार असल्याचे दिसते. भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादीला 100 च्या जवळपास जागा मिळणार असल्याचे रोहित पवारांनी दिलेल्या माहिती म्हटले आहे.

रोहित पवारांनी ‘एक्स’वर सर्व्हेबाबत पोस्ट केली आहे. एका Internal Source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. सर्व्हेमध्ये अजितदादांच्या गटाला 7-11 जागा, शिंदे साहेबांच्या गटाला 17-22 जागा आणि भाजपला 62-67 जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
BJP Vs NCP SharadChandra Pawar Party : 'कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको'; कोणासंदर्भात आहे हे...

सर्व्हेमुळे भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्याचेही रोहित पवारांनी म्हटले आहे. रोहित पवारांचा हा दाव्यावर अद्याप महायुतीतील नेत्यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. लोकसभा निवडणुकीवेळीही भाजपने सर्व्हे केला होता. त्यानुसार सेनेच्या काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले होते, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती.

भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या आहेत. अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर 6 ते 7 जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिली, असल्याचा मोठा दावाही रोहित पवारांनी केला आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Governer Radhakrishnan: पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतच सत्ताधारी आमदारांचे राज्यपालांकडे समस्यांचे रडगाणे!

कर्जत-जामखेड य़ा आपल्या विधानसभा मतदारसंघाबाबतही रोहित पवारांनी मोठा दावा केला आहे. कर्जत-जामखेड संदर्भात तर "कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको", असं सांगितल्याने कर्जत-जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com