Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील पहिले Union Budget 2024 सादर झाले. यात आंध्र प्रदेश आणि बिहार राज्यांना झुकते माप मिळाले. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नाही, असा विरोधकांनी आरडाओरडा सुरू केला. विरोधक भाजप केंद्र सरकारच्या बजेटवर तुटून पडले असतानाच, माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील भाजपची आग होईल, अशी प्रतिक्रिया दिली.
भाजप (BJP) महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करते? असा संतप्त अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत Union Budget 2024 केले. हा अर्थसंकल्प मांडताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा साधा उल्लेख नव्हता. तसेच महाराष्ट्राला काही देखील अर्थसंकल्पातून देण्यात आलेले नाही. शिवाय अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राचे नाव देखील अर्थसंकल्प मांडताना घेतले नाही.
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी अर्थसंकल्पावर तिखट आणि भाजपला झोंबणारी पोस्ट ट्विटरवर शेअर केली. भाजपला आपले केंद्रातील सरकार वाचवायचे आहे. त्यामुळे त्यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठ्या प्रमाणात निधी दिली. हे लहान मुल देखील सांगेल. पण यात महाराष्ट्राचा काय दोष आहे?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे करदाते राज्य आहे, हा दोष आहे का? अर्थमंत्र्यांनी एकदा देखील महाराष्ट्राचा उल्लेख केला नाही. तो का केला नाही? भाजप महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करते? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्र आणि मुंबईचा द्वेष करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, गेल्या दशकभरात भाजपच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राविरुद्ध हा पक्षपातीपणा सुरूच असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला. असंवैधानिकपणे सरकार स्थापन करून आणि आपल्या राज्यात सर्वात भ्रष्ट राजवट चालवूनही महाराष्ट्राला त्याबदल्यात काहीच मिळत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मिंधे राजवटीतील भ्रष्टाचार आणि नंतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून महाराष्ट्राची सुरू असलेली लूट, यालाच आपल्याला तोंड द्यावे लागत आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.