Tirupati Temple Stampede : दुर्दैवी! जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, 6 भाविकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

Tragic Stampede at Tirupati Temple : आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध अशा तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. या घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Tirupati Temple Stampede
Tirupati Temple StampedeSarkarnama
Published on
Updated on

Tirupati Stampede Tragedy : आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध अशा तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. या घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

तिरुपती मंदिराच्या रामानायुडू शाळेजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत मल्लिगा (50) यांच्यासहित एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चेंगराचेंगरीत जखमी झालेलया भाविकांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन 10 दिवसांसाठी खुले करण्यात आले आहे. या दर्शनाचे तिकीट मिळवण्यासाठी हजारो भाविक पहाटेपासून तिकीट केंद्रांवर रांगेत उभे होते. याच तिकीटाच्या रांगेत अचानाक चेंगराचेंगरी झाल्यामुळे भाविकांचा एकच गोंधळ उडाला आणि भाविकांनी इकडे तिकडे धावायला आणि रांगेतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. यात 6 जणांचा मृत्यू झाला.

Tirupati Temple Stampede
Amit Shah News : अजितदादांनी घेतली अमित शाहांची भेट? दिल्लीतील बैठकीबाबत कमालीची गुप्तता

दरम्यान, या दुर्दैवी घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी शोक व्यक्त केला आहे. तर या घटनेत जखमी झालेल्या भाविकांची मुख्यमंत्री नायडू भेट घेणार असल्याची माहिती आहे. तर या घटनेनंतर मंदिर समितीचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी तातडीची बैठक घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 10 ते 19 जानेवारीदरम्यान वैकुंठ दर्शन सुरू होणार आहे. या कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी तिरुपती मंदिरात येतील. यासाठी तिरुपती मंदिर ट्रस्टने संपूर्ण तयारीही केली आहे. टीटीडीने गुरुवारपासून तिरुपतीमधील 9 केंद्रांमध्ये 94 काउंटरद्वारे वैकुंठ दर्शन टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच दर्शनासाठी टोकन घेण्यासाठीच्या एका तिकीट केंद्रांवर ही चेंगराचेंगरीची घटना घडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com