
Delhi News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिल्लीत गेले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचे समजते. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. या भेटीवेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आरोप-प्रत्यारोप होत असून त्याबाबत या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासोबतच राज्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा आणि शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याबाबतच्या बातम्या व दिल्ली विधानसभा निवडणूक या विषयवार चर्चा झाल्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतले असल्याचे वृत्त आहे. यावेळी दोन नेत्यांमध्ये विविध विषयवर चर्चा झाली असल्याचे समजते. या भेटीमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अजित पवार दिल्लीत आल्यानंतर त्यांचा भेट घेण्याचा कार्यक्रम निश्चित नव्हता. मात्र, प्रफुल्ल पटेल यांच्या घरातून त्यांनी थेट अमित शाहांचे (Amit Shah) निवासस्थान गाठले. पालकमंत्रिपदासाठी ही भेट होती असे जरी सांगण्यात येत असले तरी बीडच्या प्रकरणावरच प्रामुख्याने चर्चा झाल्याची शक्यता आहे. बीडच्या प्रकरणामुळे विरोधक आक्रमक झाले असून सरकार कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. त्यामुळे या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली.
सध्या बीडचा मुद्दा हा देशभर गाजत आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसोबत सत्ताधारी नेत्यांकडूनही होताना दिसत आहे. राज्याच्या राजकारणावर अमित शााहंची नजर असून याच विषयावर त्यांनी अजित पवारांकडून माहिती घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीत नेमके काय झाले याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.
बजरंग सोनवणे, पंकजा मुंडेंनीही घेतली होती भेट
केंद्रीय मंत्री अमित शाहांची या पूर्वी खासदार बजरंग सोनवणे, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवारांनीही अमित शाहांची भेट घेतल्याने या बैठकीत बीडचा मुद्दा हा केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.