पंतप्रधान मोदी आता जेम्स बाँडच्या रूपात! सौजन्य : तृणमूल काँग्रेस

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेम्स बाँडच्या अवतारात दाखवण्याचे काम तृणमूल काँग्रेसने केले आहे.
Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : बाँडपटांची भुरळ जगभरातील चित्ररसिकांना कामय पडत असते. यातील जेम्स बाँड (James Bond) या पात्राबद्दल जनमाणसांत खूपच आकर्षण आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जेम्स बाँडच्या अवतारात दाखवण्याचे काम तृणमूल काँग्रेसने (TMC) केले आहे. मोदी यांना सुटाबुटात दाखवले असून, त्यांच्या 7 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला आहे.

तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी फेसबुकवर हे पोस्टर शेअर केले आहेत. त्यावर सुटाबुटातील मोदी हे बाँडच्या दिमाखात चालताना दिसत आहेत. ते मला 007 म्हणतात, असा बाँडचा डायलॉगही पोस्टरवर दिसत आहेत. त्यावर 0 विकास, 0 आर्थिक वाढ, 7 वर्षांचे आर्थिक गैरव्यवस्थापन असेही लिहिले आहे. मोदींच्या सरकारच्या सात वर्षांच्या कारकिर्दीचे वाभाडे तृणमूलने अशा प्रकारे काढले आहेत.

बाँडपटात जेम्सचा बाँडचा क्रमांक 00 असतो आणि मारण्याचा परवाना असणारा तो सातवा एजंट असतो. त्यामुळे तो 007 या नावाने ओळखला जात असतो. तृणमूलने मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळावर याच क्रमांकाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर या दोन मोठ्या निर्णयांवर मोठी टीका झाली होती.

Narendra Modi
पेट्रोल दोनशेवर गेल्यास टू-व्हिलरवर ट्रिपल सीटला परवानगी! भाजप प्रदेशाध्यक्षांची मोठी घोषणा

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चालू महिन्यात 15 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशात पेट्रोलचा दर विमान इंधनापेक्षा 33 टक्के जास्त आहे. विमान कंपन्यांना ज्या दरात इंधन विकले जाते त्यापेक्षा 33 टक्के जास्त दराने वाहनचालक पेट्रोलची खरेदी करीत आहेत. विमान इंधनाचा दर दिल्लीत प्रतकिलोलीटर 79 हजार 20 रुपये म्हणजेच 79 रुपये लिटर आहे. यामुळे देशात आता विमान चालवण्यापेक्षा वाहन चालवणे महाग झाल्याची टीका होत आहे.

Narendra Modi
भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरूद्ध तक्रार अन् राहुल गांधी आरोपी

सध्या देशात इंधनाचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. पेट्रोलच्या दराने देशभरात शंभरी ओलांडली होती. आता डिझेलच्या दरानेही शंभरी ओलांडण्यास सुरवात केली आहे. अशातच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ सुरू आहे. चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवर पोचली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com