

Tripura DGP : त्रिपुराचे पोलीस महासंचालक (DGP) अनुराग धनखड यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांचा मृतदेह अगरतला येथील पोलीस मुख्यालयातील कार्यालयात आढळून आल्याने संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने अगरतला येथील गोविंद बल्लभ पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी पुढील आवश्यक वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्या.
अनुराग धनखड यांचा मृतदेह त्यांच्या कार्यालयीन कक्षात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अधिकृतरीत्या कोणतेही कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस मुख्यालयाचा परिसर तात्काळ सुरक्षा कवचाखाली घेण्यात आला. तपास पथकाने घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून सर्व बाबींचा बारकाईने तपास केला जात आहे. या घटनेबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.
या दुर्दैवी घटनेची बातमी समोर येताच राज्यभरात खळबळ उडाली असून. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्रिपुराचे मुख्यमंत्री प्रो. (डॉ.) माणिक साहा यांनी तत्काळ पोलीस मुख्यालयाला भेट दिली. यावेळी मुख्य सचिव जे. के. सिन्हा यांच्यासह गृह विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अनुराग धनखड हे 1994 बॅचचे पोलीस अधिकारी (IPS) होते. त्यांनी 2025 मध्ये त्रिपुराचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या तपासांमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावली होती. विशेषतः नीरव मोदी प्रकरणाच्या चौकशीत त्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच 1984 मधील शीख समुदायावरील हत्याकांडाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) नेतृत्वही त्यांनी केले होते.
दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी तपास यंत्रणा चौकशी करत असून अंतिम अहवालानंतरच या प्रकरणाचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.