Truck Drivers Strike : ट्रकचालकाची औकात काढणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून उचलबांगडी

IAS Kishor Kumar Kanyal : किशोरकुमार कन्याल यांचा व्हिडीओ व्हायरल...
IAS Kishor Kumar Kanyal
IAS Kishor Kumar KanyalSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh News : ट्रकचालकांच्या आंदोलनात एका जिल्हाधिकाऱ्यांना आपले पद गमवावे लागले आहे. टँकरचालकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना जिल्हाधिकाऱ्यांनी एका चालकाची औकात काढली. त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) आयएएस अधिकारी किशोरकुमार कन्याल (IAS KishorKumar Kanyal) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव (CM Mohan Yadav) यांनी कारवाईचा बडगा उगारला. कन्याल के शाजापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. मंगळवारी ट्रकचालक संघनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले. पण चालक ऐकायला तयार नसल्याने कन्याल चिडले आणि एका चालकाला उद्देशून तुझी औकात काय आहे? असे म्हणाले.

IAS Kishor Kumar Kanyal
Chief Minister in Jail : सोरेन, केजरीवालांवर अटकेची टांगती तलवार; थेट मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकता येते का?

कन्याल यांच्या या विधानानंतर ट्रकचालकांमधील रोष आणखी वाढला. यावेळी उपस्थित चालकाने आम्ही आमच्या औकातीसाठीच लढत असल्याचे म्हटले. या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाल्यानंतर कन्याल यांनी रात्री दहा वाजता त्यावर खुलासा करणारा व्हिडीओ प्रसारित केला. कुणाच्या भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता, असे म्हणत कन्याल यांनी दिलगिरी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कन्याल यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्याने मुख्यमंत्र्यांना त्याची दखल घ्यावी लागली. त्यानंतर बुधवारी कन्याल यांना जिल्हाधिकारीपदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागी ऋजू बाफना यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर कन्याल यांना उपसचिव म्हणून नियुक्ती देण्यात आल्याचे बदली आदेशात नमूद करण्यात आले आहे.

IAS Kishor Kumar Kanyal
Adani-Hindenburg Case : सुप्रीम कोर्टाचा अदानींना मोठा दिलासा; तीन महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे ‘सेबी’ला आदेश

दरम्यान, या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री यादव म्हणाले, अशा प्रकारची भाषा आमचे सरकार सहन करणार नाही. मीही एका मजुराचा मुलगा आहे. त्यामुळे अशी भाषा बोलणे योग्य नाही. अधिकाऱ्यांनी आपली भाषा आणि वागणुकीवर लक्ष द्यायला हवे. हे सरकार गरिबांचे आहे. सगळ्यांच्या कामाचा सन्मान व्हायला हवा. त्यांच्या भावनांचा सन्मान व्हावा, असे यादव यांनी नमूद केले.

IAS Kishor Kumar Kanyal
Arvind Kejriwal : तिसऱ्या नोटीशीनंतर तरी केजरीवाल ED चौकशीला आज हजर राहतील का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com