Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारत अॅक्शन मोडवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारवाईसाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानकडून भारत आपल्यावर कधीही हल्ला करेल, अशी भीती व्यक्त करत आहेत. युद्धाच्या छायेत असलेल्या पाकिस्तानला मित्र राष्ट्र तुर्कीने मोठी मदत केली आहे. तुर्कीने आपले लढाऊ जहाज (TCG Büyükada) कराची बंदारामध्ये पोहोचवले आहे.
पाकिस्तानकडून सांगण्यात आले की, तुर्कीचे लढाऊ जहाज हे पाकिस्तानमध्ये येणे हा दोन्ही देशांमधील ताळमेळ वाढवण्याची रणनीती आहे. या जहाजासोबत पाकिस्तानी नौदलाचे अधिकारी युद्धसराव करण्याची देखील माहिती आहे. पाकिस्तान आणि तुर्कीमध्ये चागंले संबंध असून ते आर्थिक आणि युद्ध सामग्रीच्या बाबतीत एकमेकांना सहयोग करत असतात.
तुर्कीच्या कंपन्यांकडून पाकिस्तानला युद्धसाठी आवश्यक असलेल्या लष्करी साहित्याची मदत देखील केली जात आहे. तुर्की संरक्षण कंपन्यांकडून ओगोस्टा 90 या पाणबुडीचे आधुनिकीकरण करण्यास पाकिस्तानला मदत करण्यात आली आहे. तसेच ड्रोनसह इतर लष्करी साहित्य देखील पुरवले आहे. दोन्ही राष्ट्रामध्ये संयुक्तपणे युद्ध सराव देखील होत असतो.
मुस्लिम राष्ट्रांची संघटना असलेल्या आयओसीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. या संघटनेमध्ये 57 मुस्लिम राष्ट्र आहेत. या संघटनेचे नुकतीच बैठक न्यूयाॅर्क येथे झाली. या बैठकीत पाकिस्तानने भारत युद्ध करण्याच्या तयारीत असल्याचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला होता. तेव्हा आयओसी ही पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या नागरिकांसोबत असल्याचे म्हटले होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. मोदी- सिंह यांच्यात बैठका होत आहेत. पंतप्रधान मोदी सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात जनतेच्या मनात आहेत तेच होणार असे म्हणत पाकिस्तानला धडा शिकवण्याचे संकेत दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.