Senior leader Allegations : राजकारणात खळबळ! बड्या नेत्यावर पत्नीचे गंभीर आरोप; जुनं प्रेम प्रकरण भोवणार!

Senior political leader controversy : एका बड्या नेत्यावर त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्या प्रेमप्रकरणाच्या चर्चेमुळे वाद अधिकच चिघळला आहे.
Senior leader Allegations : राजकारणात खळबळ! बड्या नेत्यावर पत्नीचे गंभीर आरोप; जुनं प्रेम प्रकरण भोवणार!
Published on
Updated on

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते थलपती विजय सध्या त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कौटुंबिक आयुष्याबाबत विविध बातम्या समोर येत असून, त्यांची पत्नी संगीता सोरनलिंगम यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आली आहे. या घडामोडीमुळे चाहत्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या आहेत.

काय आहेत पत्नी संगीताने केलेले गंभीर आरोप

संगीता यांनी आपल्या अर्जात काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की विजय यांचे एका अभिनेत्रीशी विवाहबाह्य संबंध होते. त्यांच्या मते, 2021 साली त्यांना या संबंधांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पतीकडे या विषयावर स्पष्टीकरण मागितले आणि नातेसंबंध संपवण्याची मागणी केली. अर्जात नमूद केल्याप्रमाणे, विजय यांनी संबंध तोडण्याचे आश्वासन दिले होते; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, असा त्यांचा आरोप आहे. या कारणांमुळे अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला.

Senior leader Allegations : राजकारणात खळबळ! बड्या नेत्यावर पत्नीचे गंभीर आरोप; जुनं प्रेम प्रकरण भोवणार!
DA Hike Pensioners : सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता पेन्शनर्सना सरकारचं मोठं गिफ्ट! महागाई भत्ता 257 टक्क्यांवर, जाणून घ्या कधीपासून मिळणार लाभ

संगीता यांनी विशेष विवाह अधिनियम १९५४ अंतर्गत कलम २७(१)(अ) चा आधार घेत जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या तरतुदीनुसार, विवाहानंतर पती किंवा पत्नीने जोडीदाराशिवाय इतर व्यक्तिसोबत स्वेच्छेने शारीरिक संबंध ठेवले असल्यास, त्या कारणावरून घटस्फोटाची मागणी करता येते. हा कायदा दोन्ही पक्षांना समान हक्क देतो आणि न्यायालयात याचिका दाखल करताना ठरावीक नियम व प्रक्रिया पाळणे आवश्यक असते. संबंधित प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया पुढे कशी सरकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विजय यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि दक्षिणेकडील प्रेक्षकांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनयासोबतच त्यांनी अलीकडे राजकारणातही पाऊल ठेवले. त्यांनी ‘तमिळगा वेत्री कळघम’ या नव्या पक्षाची स्थापना केली असून, तामिळनाडूच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

TVK Chief Vijay divorce news
TVK Chief Vijay divorce newsSarkarnama

पक्ष स्थापनेनंतर त्यांनी राज्यभर दौरे, कार्यकर्त्यांशी बैठक आणि विविध सामाजिक प्रश्नांवर भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. युवक, महिला आणि मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाचा अजेंडा ठरवला जात आहे.

Senior leader Allegations : राजकारणात खळबळ! बड्या नेत्यावर पत्नीचे गंभीर आरोप; जुनं प्रेम प्रकरण भोवणार!
Ajit Pawar Plane Crash Update: नेमकं काय घडलं 'त्या' काही सेकंदात? अजितदादांच्या विमान अपघातात तांत्रिक बिघाड की घातपात? 'मिस्ट्री' उलगडणार!

दरम्यान, त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील या घडामोडींमुळे त्यांच्या प्रतिमेवर काय परिणाम होईल, याबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. विजय आणि संगीता यांचा विवाह सुमारे 27 वर्षांपूर्वी झाला होता. इतक्या दीर्घकाळ टिकलेले नाते आता तुटण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विजय यांच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांनी आतापर्यंत 65 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. त्यातील बहुतांश चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘मास्टर’ आणि ‘थेरी’ यांसारख्या चित्रपटांनी विक्रमी उत्पन्न मिळवले होते. मात्र, एकीकडे राजकारणातील नव्या प्रवासाची सुरुवात आणि दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी यामुळे विजय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. राजकारणातील नव्या प्रवासाची सुरुवात आणि दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी यामुळे आगामी काळात एकूनच कसा परिमाण होतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com