
थोडक्यात बातमी:
उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर: उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. यावेळी शरद पवार व राहुल गांधींसोबतही त्यांच्या भेटी होणार आहेत.
प्रियांका चतुर्वेदी यांची मोदींशी भेट: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अचानक भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
राजकीय चर्चांवर स्पष्टीकरण: चतुर्वेदी यांनी ही भेट सहज असल्याचे स्पष्टीकरण दिले असून, त्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, असे स्पष्ट केले आहे.
New Delhi News : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला नवीन प्रभाग सीमांकनानुसार 27 टक्के इतर मागासवर्गीय आरक्षण (ओबीसी) सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचदरम्यान, राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता दिल्लीतून महत्त्वाची राजकीय अपडेट पुढे येत आहे.
एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आठवडाभरातच दुसरा दिल्ली दौरा चर्चेत असतानाच आता उद्धव ठाकरेही दिल्लीला गेले आहेत. ते एकूण तीन दिवस दिल्लीत असणार आहेत. या त्यांच्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अचानक भेट घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी सोमवारी (ता.4 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.चतुर्वेदींनी मोदींच्या घेतलेल्या भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 6 ऑगस्ट रोजी दिल्ली दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत युवासेनेचे आदित्य ठाकरेही असणार आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ठाकरेंना भोजनाचे आमंत्रणही देण्यात आल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरे 7 तारखेला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांची ठाकरेंसोबत दिल्ली दौऱ्यादरम्यान बैठक होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असून ते खासदार राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत. पण उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याआधीच त्यांच्या शिवसेना पक्षाच्या महिला खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी अचानकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
उद्धव ठाकरे दिल्लीत पाऊल ठेवण्याआधीच त्यांच्या पक्षाच्या एका खासदारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे-राज ठाकरे युतीची जोरदार चर्चा, राहुल गांधींसोबत डिनर डिप्लोमसी आणि दुसरीकडे चतुर्वेदींनी मोदींची भेट घेतल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसह राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
प्रियांका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मात्र ही भेट सहज होती. त्या भेटीमागे कोणताही राजकीय अर्थ काढू नये. उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीत येणार आहेत. याआधी माझी नरेंद्र मोदी यांच्याशी सहज भेट झाली. त्या भेटीत महाराष्ट्रावर कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच माझी भेट राजकारणाशी संबंधित नसल्याचा खुलासा चतुर्वेदी यांनी केला आहे.
या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तसेच अन्य काही महत्त्वाची कामे ते दिल्लीत करणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते खासदार राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत.
उद्धव ठाकरे का गेले आहेत दिल्लीला?
➤ इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत.
प्रियांका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान मोदी यांची का घेतली भेट?
➤ त्यांनी सांगितले की ही भेट पूर्णपणे सहज होती, राजकीय हेतू नव्हता.
उद्धव ठाकरे कोणकोणत्या नेत्यांना भेटणार आहेत?
➤ शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत.
या दौऱ्याचा पक्षराजकारणावर काही परिणाम होणार का?
➤ सध्या तरी अधिकृत राजकीय परिणाम घोषित नाहीत, मात्र चर्चा तापल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.