Uddhav Thackeray Raj Thackeray : झुरळ' ते 'हुकूमशहा'! विजयी सभेतून उद्धव ठाकरेंनी दिला 'भारत विरुद्ध भाजप' संघर्षाचा नारा.. राज ठाकरे काय म्हणाले?

Uddhav Thackeray, Raj Thackeray, Mumbai Victory Rally : रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीच्या व्यासपीठावरुन ठाकरे बंधूंनी सरकारवर तोफ डागली.
Narendra Modi-Uddhav Thackeray-Raj Thackeray
Narendra Modi-Uddhav Thackeray-Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत विजय जल्लोष सभा आयोजित केली होती. मुंबईच्या शिवाजी पार्क येथे आयोजित या विजयी सभेत तिरंगा रॅलीच्या व्यासपीठावरुन ठाकरे बंधूंची भाषणे झाली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे म्हणाले, एका झुरळाने हुकूमशहाला नमवलं आहे. अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले आहेत. आता नव्या संघर्षाची सुरुवात झाली आहे, भाजपविरुद्ध भारत असा संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षात जातपात, धर्म विसरुन सहभागी व्हा. मी भारतीय आहे, ही जाणीव ठेवा असे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी पीएम मोदींवर निशाणा साधला. मोदीजी आतातरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री फक्त दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत, त्यांनी देशाच्या कारभाराकडे लक्ष द्यावे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या घसरता रुपया, महागाईवर बोलत नाही. पण पेपरफुटीचे फायदे सांगतात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे धर्मेंद्र प्रधान यांचे सरंक्षण करत असल्याची टीका त्यांनी केली.

Narendra Modi-Uddhav Thackeray-Raj Thackeray
Uddhav Thackeray Politics : उद्धव ठाकरे पुन्हा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी! दिल्ली आंदोलनातून नवी संधी?

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेताना मोदींना ज्या यातना झाल्या त्याहीपेक्षा अधिक यातना विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबीयांना झाल्या आहेत. त्या वेदना आम्ही कधीही विसरू शकत नाही आणि विसरणारही नाही. काही अंधभक्त मुलांना धमक्या देत आहेत. त्यांचे व्हिडिओ शेयर करा आणि त्यांना खरे हिंदुत्व शिकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

राज ठाकरे काय म्हणाले?

आजचा दिवस भाषण करण्याचा नाही. तुम्ही जे आंदोलन पेटवले होते, त्याला मिळालेलं यश आणि त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत. या देशातील जेनझी ने या सरकारच्या झिंज्या उपटल्या असून Gen Z तरुण या सरकारला कसे वठणीवर आणू शकतात, हेच या आंदोलनातून स्पष्ट झाल्याचं राज ठाकरे म्हणाले.

Narendra Modi-Uddhav Thackeray-Raj Thackeray
Dharmendra Pradhan salary : धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री म्हणून दर महिन्याला किती मिळायचा पगार? जाणून घ्या सुविधांचे गणित

दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी नीटपेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या सर्व २१ विद्यार्थ्यांची नावे जाहीरपणे वाचून दाखवत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक मिनिटे मौन धारून करून आणि शांत उभे राहू असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी सगळेजण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com