Thackeray vs Shinde : सत्तासंघर्षावर आज सुनावणी पुर्ण होणार? ; शिंदे गटाचे वकील हरिश साळवेंचा लागणार कस!

Thackeray vs Shinde : शिंदे गटाचा युक्तिवाद राहिला होता अपूर्ण..
Uddhav Thackeray Ekanth Shinde
Uddhav Thackeray Ekanth ShindeSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्लीः शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील (Thackeray vs Shinde) सत्तासंघर्षावर आजा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर आता शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण होणार आहे. मागील सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या युक्तिवादाला सुरुवात झाली होती. मात्र शिंदेंच्या वकिलांकडून आणखी वेळ मागितल्याने आज त्यांचा युक्तिवाद पार पडणार आहे.

शिंदे गटाची बाजू लढवणारे ज्येष्ठ वकील निरज किशन कौल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे आज आपला युक्तिवाद मांडतील. तसेच तत्कालीन राज्यपालांची बाजू सॉलिटर जनरल तुषार मेहता मांडणार आहेत.

Uddhav Thackeray Ekanth Shinde
Supreme Court News : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय : केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड होणार समितीद्वारे; केंद्राला धक्का

शिंदे गटाचा युक्तिवाद आज पूर्ण होणं अपेक्षित आहे. यासह आजच स्थानिक निवडणुकांच्या सुनावणीचीही तारीख आहे. याची तारीख लांबणीवर जाण्यीच शक्यता वर्तवण्यात येत आहे. सत्तासंघर्षावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरूवात होईल

सत्तासंघर्ष प्रकरणावरील सुनावणी प्रक्रिया २ मार्चपर्यंतच न्यायालयाला पूर्णपणे पार पाडायची अपेक्षा होती. यासाठी न्यायालयाने वेळापत्रक देखील आखले होते. मात्र शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचा युक्तिवाद या निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे त्यांनी वेळा वाढवून मागितली होती.

Uddhav Thackeray Ekanth Shinde
Supreme Court hearing : सत्तासंघर्षावरील सुनावणी आता १४ मार्चला; शिंदे गटाच्यावतीने वेळेवर ज्येष्ठ वकील मैदानात

आता यावर प्रकरणी सुनावणीची प्रक्रिया लवकर आणि वेळेत पार पडावी यासाठी सरन्यायाधीशांनी सर्व वकीलांना वेळा ठरवून दिल्या. यानुसार आता आज सुनावणी सुरू होऊन, सकाळच्या सत्रात शिंदे गटाच्या वकीलांनी युक्तिवाद पूर्णपणे पार पाडावा,असे सांगितले आहे. आज शिंदे गटाचा युक्तिवाद पुर्ण होणे अपेक्षित आहे. सुनावणीनंतर न्यायालय निर्णय देण्याच्या टप्प्यावर येईल. आज सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरूवात होईल .

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com