Ujjwal Nikam News : ती बातमी खोटी निघाली, पण निकम राज्यसभेत पोहचले! काँग्रेसच्या महिला नेत्यानं जुना मुद्दा काढला उकरून

Ujjwal Nikam’s Rajya Sabha Nomination: A Controversial Turn : उज्ज्वल निकम यांना राज्यसभेची खासदारकी मिळताच काँग्रेसने जुना मुद्दा उकरून काढत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Ujjwal Nikam News : ती बातमी खोटी निघाली, पण निकम राज्यसभेत पोहचले! काँग्रेसच्या महिला नेत्यानं जुना मुद्दा काढला उकरून
Sarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha Nomination : राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ व विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेत वर्णी लागली आहे. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता वर्षभरातच त्यांच्या गळ्यात राज्यसभेच्या खासदारकीची माळ पडली आहे.

उज्ज्वल निकम यांना राज्यसभेची खासदारकी मिळताच काँग्रेसने जुना मुद्दा उकरून काढत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्ष सुप्रिया श्रीनेत यांनी एक्सवर एक पोस्ट करत दहशतवादी अजमल कसाबच्या केसवरून निकम यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

सुप्रिया श्रीनेत काय म्हणाल्या?

सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे उज्ज्वल निकम आहेत. राज्यसभेसाठी नामनिर्देशित झाले आहेत. याआधी मुंबईतून भाजपने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. पण पराभूत झाले. त्यांनी असा काय तीर मारला की ते राज्यसभेत पोहचले, असा सवाल करत श्रीनेत यांनी केला आहे.

Ujjwal Nikam News : ती बातमी खोटी निघाली, पण निकम राज्यसभेत पोहचले! काँग्रेसच्या महिला नेत्यानं जुना मुद्दा काढला उकरून
Rajya Sabha Elections : राज्यसभेतून तब्बल 73 नेते होणार निवृत्त; 2026 च्या यादीत महाराष्ट्रातील 7 मोठी नावे, राजकारण फिरणार

पुढे सुप्रिया श्रीनेत यांनी लिहिले आहे की, मुंबई दहशतवादी हल्लात अजमल कसाबला पकडण्यात आले होते. तेव्हा ते सरकारी वकील होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, कसाबला जेलमध्ये बिर्याणी दिली. ही खोटी माहिती घराघरात पोहचली. भाजपने मोठा मुद्दा बनवला. नंतर निकम यांनीच कसाबला बिर्याणी दिली नव्हती, असे सांगितले. खोटी बातमी आगीप्रमाणे पसरली, पण खरं कोण ऐकते? पण ही खोटी बातमी चालवून काँग्रेसच्या विरोधात वातावरण निर्मिती करणारे उज्ज्वल निकम राज्यसभेत जरूर पोहचले, त्यांना बक्षीस मिळाले, असा निशाणा श्रीनेत यांनी साधला आहे.

Ujjwal Nikam News : ती बातमी खोटी निघाली, पण निकम राज्यसभेत पोहचले! काँग्रेसच्या महिला नेत्यानं जुना मुद्दा काढला उकरून
PM Modi’s Strategy : 30 व्या वर्षीच दोन्ही पाय तोडले, तरीही लढले! पंतप्रधान मोदींचा विधानसभेसाठी 'मास्टर'स्ट्रोक

दरम्यान, उज्ज्वल निकम यांचा मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला होता. त्यानंतर निकम हे सक्रीय राजकारणात फारसे दिसले नाहीत. मात्र, अचानक राज्यसभेसाठी थेटच राष्ट्रपती कोट्यातून त्यांना संधी मिळाल्याने राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे. निकम यांचे पुत्र अनिकेत निकम हे भाजपचे प्रवक्ते आहेत. तेही वकिली व्यवसायात आहेत.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com