UK Election 2024 : महाराष्ट्रात 2019 मध्ये ‘वंचित’नं जे केलं, तेच ब्रिटनमध्ये घडलं! 4 खासदार असलेला पक्ष ठरला कर्दनकाळ

Rishi Sunak Nigel Farages Keir Starmer : ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीत किअर स्टारमर यांच्या पक्षाने 400 हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे.
Nigel Farage, Keir Starmer, Rishi Sunak
Nigel Farage, Keir Starmer, Rishi SunakSarkarnama
Published on
Updated on

UK Election : ब्रिटनमध्ये 14 वर्षानंतर पुन्हा एकदा लेबर पार्टीची सत्ता आली आहे. पक्षाला सार्वत्रिक निवडणुकीत 400 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंझर्वेटिव्ह पक्षाला केवळ 119 जागांवर समाधान मानावे लागले आहे. सुनक यांच्या या दारुण पराभवामागे केवळ चार जागांवर विजय मिळालेल्या पक्षाचा मोठा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुनक यांनी पराभव मान्य करत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. लेबर पार्टीचे किअर स्टारमर पुढील पंतप्रधान असतील. त्यांच्या पक्षाच्या ऐतिहासिक विजयात रिफॉर्म यूके हा पक्ष आणि या पक्षाचे नेते निगेल फराज यांची भूमिका महत्वाची ठरली आहे.

Nigel Farage, Keir Starmer, Rishi Sunak
UK Election Results 2024 LIVE : अब की बार 400 पार! जे मोदींना जमलं नाही, ते ‘या’ नेत्यानं करुन दाखवलं...

निगेल फराज यांच्या पक्षाचे निवडणुकीत चार खासदार निवडून आले आहे. त्यामध्ये फराज यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच पक्षाचे खासदार निवडून आले आहेत. स्वत: फराज यांनी सातवेळा प्रयत्न करूनही विजय मिळाला नव्हता. अखेर यावेळी आठव्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले आहे. ते 60 वर्षांचे आहेत.

निवडणूक निकालाकडे पाहिल्यास असे दिसते की, ज्या मतदारसंघात लेबर पार्टीचे उमेदवार सहजपणे विजयी झाले आहेत, तिथे बहुतेक जागांवर रिफॉर्म यूके पक्षाची कामगिरी चांगली ठरली आहे. काही मतदारसंघात निगेल फराज यांचा पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे. तर सुनक यांचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत. परिणामी, त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. 

Nigel Farage, Keir Starmer, Rishi Sunak
Video Sandeep Thapar : शिवसेना नेत्यावर पंजाबमध्ये जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक

महाराष्ट्र वंचितने दाखवली कमाल

महाराष्ट्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशीच कमाल केली होती. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 12 ते 13 उमेदवारांचा पराभव होण्यास वंचितचे उमेदवार कारणीभूत ठरले होते. या मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना मिळालेली मतं लक्षणीय होती. त्याचा मोठा फटका आघाडीला बसला होता.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com