Russia Vs Ukraine : युक्रेनकडून पुन्हा रशियाला मोठा झटका; पुतिन झोपेत असतानाच ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला सुरूंग

Ukrainian attack on the Kerch Bridge : युक्रेनसोबतच्या संघर्षादरम्यान मोठ्या प्रमाणात युध्दसामुग्री नेण्यासाठी रशियाने याच पुलाचा वापर केला आहे. त्यामुळे हा पूल रशियासाठी महत्वाचा मानला जातो.
An underwater explosion damages the structural supports of the Kerch Bridge, a vital link between Russia and Crimea, following a Ukrainian SBU operation.
An underwater explosion damages the structural supports of the Kerch Bridge, a vital link between Russia and Crimea, following a Ukrainian SBU operation. Sarkarnama
Published on
Updated on

Ukrainian SBU operation : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष आता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. युक्रेनने पुन्हा एकदा रशियाला हादरा दिला आहे. युक्रेनच्या सुरक्षा सेवा विभागाने मंगळवारी एक मोठे ऑपरेशन तडीस नेले. रशियासाठी महत्वाचा मानला जात असलेला क्रीमियन पूल उडवून देण्याचा प्रयत्न यूक्रेनने मंगळवारी पहाटे केला. हा पूल रशियासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो.

क्रीमियन पुलाखाली अंडरवॉटर तब्बल 1100 किलोचे टीएनटी विस्फोटकचा वापर करण्यात आल्याचे समजते. या शक्तीशाली विस्फोटकाच्या माध्यमातून स्फोट घडवून आणत युक्रेनने (Ukraine) मंगळवारी पहाटे रशियाची झोप उडवली. हा पूल रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो.

क्रीमियन पुलाला केर्च ब्रिज म्हणून ओळखले जाते. रशिया आणि क्रीमियाला रस्ता आणि रेल्वेने जोडणारा हा पूल आहे. 2014 मध्ये रशियाने क्रीमियावर कब्जा केल्यानंतर पुतिन यांनी हा पूल तयार केला होता. युक्रेनसोबतच्या संघर्षादरम्यान मोठ्या प्रमाणात युध्दसामुग्री नेण्यासाठी रशियाने याच पुलाचा वापर केला आहे. त्यामुळे हा पूल रशियासाठी महत्वाचा मानला जातो.

An underwater explosion damages the structural supports of the Kerch Bridge, a vital link between Russia and Crimea, following a Ukrainian SBU operation.
Officials Suspension : जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांसह 12 जण एकाचवेळी निलंबित; देशातील पहिलीच मोठी कारवाई...

युक्रेनने एकप्रकारे हा पूल खिळखिळा करून रशियाचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला आहे. या ऑपरेशनसाठी वर्षभरापासून तयारी सुरू होती, असे सांगितले जात आहे. पहाचे 4 वाजून 44 मिनिटांनी पुलाखाली स्फोट घडविण्यात आला. खांबाजवळ स्फोट घडवत पूल खिळखिळा करण्याचा प्रयत्न युक्रेनने केला. दरम्यान, रशियाकडून अद्याप या स्फोटावर प्रतिक्रिया आलेली नाही.

दोनदा हल्ला

यूक्रेनने यापूर्वी 2022 आणि 2023 मध्येही या पुलावर हल्ला केला होता. पुलावरच ट्रकमधून विस्फोटके नेत स्फोट घडवून आणण्यात आला होता. 2023 मध्ये हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. आता पुन्हा तिसऱ्यांचा युक्रेनने याच पुलाला टार्गेट केले आहे. या स्फोटानंतर रशियाकडून तातडीने वाहतूक थांबविण्यात आली होती. पण स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ वाजता पुन्हा वाहतूक सुरू झाल्याचे वृत्त आहे.

An underwater explosion damages the structural supports of the Kerch Bridge, a vital link between Russia and Crimea, following a Ukrainian SBU operation.
India’s National Language : राष्ट्रीय भाषा कोणती? कनिमोळी यांनी स्पेनमध्ये दिलेले उत्तर ऐकून मोदी-शहांनीही वाजवल्या असत्या टाळ्या...

दोन दिवसांपूर्वीच विमाने नेस्तनाबूत

युक्रेनने दोन दिवसांपूर्वीच रशियाच्या पाच हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले होते. ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करत .युक्रेनने रशियाची तब्बल 41 लढाऊ विमाने नेस्तनाबूत केली होती. सोमवारी दोन्ही देशांमध्ये चर्चेसाठी बैठक होण्याआधीच हा हल्ला करण्यात आला होता. आता बैठकीनंतर दुसरा हल्ला करण्यात आला आहे. रशियाकडून आता कसे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com