Umar Khalid Bail: उमर खालीदला जामीन मंजूर! 5 वर्षांपासून तुरुंगात असलेला उमर येणार बाहेर

Umar Khalid Bail: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विविध गोष्टी करण्यावर त्याला कोर्टानं निर्बंध घातले आहेत.
Umar Khalid
Umar Khalid
Published on
Updated on

Umar Khalid Interim Bail: गेल्या पाच वर्षांपासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेला दिल्ली दंगल प्रकरणातील कथित आरोपी उमर खालीद याला अखेर कोर्टानं तात्पुरता जामीन मंजूर केला. विशेष बाब म्हणून त्याला सोडण्याचे आदेश कोर्टानं गुरुवारी दिले. उमरच्या बहिणीचं १६ डिसेंबर रोजी लग्न आहे. या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी विशेष बाब म्हणून त्याला काही अटीशर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Umar Khalid
शरद पवार महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पॉवरफुल नेते; जाणून घ्या खास गोष्टी

उमर खालीदच्या बहिणीचं लग्न असल्यानं १६ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता येणार आहे. मात्र, त्यानंतर २९ डिसेंबर रोजी त्याला पुन्हा तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण करावं लागेल असं आपल्या आदेशात कोर्टानं म्हटलं आहे. त्याचबरोबर जामीनावर तुरुंगाबाहेर असताना उमर खालीदला सोशल मीडिया वापरण्यास कोर्टानं प्रतिबंध केला आहे. तसंच कुठल्याही साक्षीदाराशी त्याला संपर्क करता येणार नाही.

Umar Khalid
GST Agitation: जीएसटीचं कामकाज कोलमडणार! अर्थमंत्री अजित पवारांच्या भेटीनंतरही अधिकारी आंदोलनावर ठाम; नेमकं काय घडलंय?

दरम्यान, यापूर्वीही उमर खालीदला ७ दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता. डिसेंबर २०२४ मध्ये त्याच्या भावाचं लग्न असल्यानं त्याला अशाच प्रकारे विशेष बाब म्हणून तात्पुरता जामीन कोर्टानं मंजूर केला होता. उमर खलीदवर दिल्ली दंगलप्रकरणी बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा, 1967 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेसंदर्भातील अत्यंत संवेदनशील कायदा असल्यानं यामध्ये जामीन सहजा सहजी मिळत नाही. त्यामुळं अद्याप सुनावणी सुरु झालेली नसतानाही उमर खालीद हा गेल्या पाच वर्षांपासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. त्याच्यासोबत शरजील इमाम हा देखील तुरुंगात आहे.

Umar Khalid
Shahaji Patil: "शहाजीबापूंनी आमची चिंता करू नये"; सांगोल्यातील आजी-माजी आमदारांनी डिवचलं!

सन २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) ला विरोध करणारं देशभरात आंदोलन सुरु होतं. दिल्लीत तर शाहीन बाग परिसरात आंदोलकांनी संपूर्ण रस्ता अडवून अनेक दिवस ठिय्या आंदोलन केलं होतं. यानंतर दिल्लीत दंगल उसळली होती. ही दंगल भडकवण्यात जेएनयूचा विद्यार्थी असलेल्या उमर खालीदवर आरोप झाले होते. त्यानंतर त्याला अटक झाली आणि त्याच्यावर UAPA अंतर्गत खटला भरण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com