खडसेंच्या धमकीबाबत अजित पवार थेट चंद्रकांत पाटलांनाच विचारणार

एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांनी धमकी दिल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Eknath Khadse, Ajit Pawar

Eknath Khadse, Ajit Pawar

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई :मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मध्यस्थी करणार असून थेट पाटलांकडेच याबाबत विचारणा करणार आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी मतदारसंघातील महिला सुरक्षित नसल्याचे टि्वट केले आहे. त्यांनी वेळेप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटलांना चोप देण्याची भाषा केली. तर आमदार पाटील यांनी खडसे पिता- पुत्रीकडून आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली. बोदवड नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुक्ताईनगर मतदारसंघात हा वाद पेटला आहे. समाजमाध्यमांवर राष्ट्रवादीने केलेल्या पोस्टमुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

<div class="paragraphs"><p>Eknath Khadse,&nbsp;Ajit Pawar</p></div>
मोदींकडून 15 वर्षांपुढील मुलांसाठी लशीची घोषणा, पण DCGI चा निर्णय वेगळाच...

पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांबाबत सिंधुदुर्ग येथे बोलताना अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे आमदार नसून अपक्ष आमदार आहेत. पण कुठल्याही पक्षाचे आमदार असले तरी त्यांनी आरोप केलेले आहेत. पाटील व खडसे या दोघांचं एकमेकांच्या विरोधात राजकीय संघर्ष आहे. आपण सिंधुदुर्गमधले आहात, राजकीय संघर्ष असल्यानंतर कशा पद्धतीने आरोप-प्रत्यारोप होतात, हे मी तुम्हाला सांगायला नको.

आमदार किंवा नागरिकांच्या जीवाला कुठे धोका असेल तर त्या बाबतीमध्ये लक्ष घालणं हे पोलिस विभागाचे काम असतं. पोलीस विभाग त्यांचं काम करेल. परंतु पहिल्यांदा नेमकं काय झालं, त्यात किती तथ्य आहे, हे उद्या ते सभागृहात आल्यानंतर त्यांना विचारेन. गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही विचारतील. त्या संदर्भातले जे काही त्यांचं म्हणणं आहे, माहिती घेऊ. त्यात तथ्य असेल तर पुढचे निर्णय घेतले जातील, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

<div class="paragraphs"><p>Eknath Khadse,&nbsp;Ajit Pawar</p></div>
समीर मेघे कोरोनाबाधित येताच आमदारांचे धाबे दणाणले, पण अजितदादा म्हणतात...

दरम्यान, एकनाथ खडसे यांनीही पाटील यांच्यावर टीका केली होती. आमदार चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या गाडीच्या चालकाने महिलेला शिवीगाळ केली आहे. या आमदाराचे अवैध व्यवसाय आहे. ते टोलवर बेकायदा पैसे वसुल करीत असतात. याबाबत आम्ही वेळोवेळी पोलिस अधिक्षकांना याबाबतचे निवेदन दिले आहे. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांना संताप येणे स्वाभाविक आहे. त्यांना महिलांबाबत अत्यंत वाईट शब्दात संभाषण केलेले आहे. याबाबतच्या दोन आँडिओ क्लिप मी दिल्या आहेत. आणखी दोन क्लिप देणार आहे. हा आमदार शिवसेनेचा नाही. ते अपक्ष आहे. त्यांना राष्ट्रवादीनं पाठिंबा दिल्याने ते आमदार झाले आहेत. त्यांचे अवैध व्यवसाय बंद झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत, असे खडसे म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com