Shivraj Singh Chouhan : केंद्रीय मंत्र्यांचा तुटक्या सीटवरून प्रवास; Air India वर माफीची नामुष्की

Shivraj Singh Chouhan on Air india : केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर विमानाच्या तुटक्या सीटवरून प्रवास करण्याची वेळ आली, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh ChouhanSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : विमानातून प्रवास करताना सर्वसामान्य प्रवाशांना अनेकदा विविध अडचणींचा सामना करावा लागतो. कधी विमानतळावर गडबड होते, कधी विमानाला उशीर होतो तर कधी प्रवासादरम्यान, काही तरी अडचण येते. आता असाच गैरसोयीचा अनुभव थेट केंद्रीय मंत्र्यांना आला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर विमानाच्या तुटक्या सीटवरून प्रवास करण्याची वेळ आली, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

स्थिती खूपच वाईट होती...

शिवराज सिंह चौहान (Shivraj singh Chouhan) यांनी स्वतः त्यांच्या एक्स हँडलवरून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "मला ऑर्गेनिक फार्मिंगच्या बैठकीला जायचे होते आणि चंदीगडमधील शेतकरी संघटनेच्या नेत्यांनाही भेटायचे होते. यासाठी मी विमानाने जाण्याचे ठरवले. पण प्रवासादरम्यानता अनुभव खूपच वाईट होता. मी एअर इंडियाच्या Al436 फ्लाइटचे तिकीट बुक केले. मला 8C सीट मिळाली होती."

"मी जाऊन सीटवर बसलो, त्यावेळी सीट तुटलेली आणि आतपर्यंत खाली गेली होती. बसणे खूप त्रासदायक होते. मी एअरलाइन कर्मचाऱ्यांना याची विचारणा केली. सीट तुटलेली होती तर मला का देण्यात आली? त्यावर त्यांनी सांगितले 'सीट खराब असल्याचे मॅनेजमेंटला आधीच कळवले होते, त्यामुळे या सीटचे तिकीट विकले जाऊ नये, असेही सांगितले होते. शिवाय अशी एकच सीट नाही, तर अनेक सीट खराब असल्याचे त्यांनी मला सांगितले."

Shivraj Singh Chouhan
Marathi Sahitya Sammelan 2025 : शरद पवारांना असलेली एक खंत; साहित्य संमेलनातून कशी दूर झाली

माझ्या सहप्रवाशांनी मला त्यांच्या चांगल्या सीटवर बसण्याची विनंती केली, पण मी माझ्यासाठी दुसर्‍या कोणाला का त्रास देऊ? असा विचार करून मी त्याच सीटवरून प्रवास पूर्ण करण्याचे ठरवले." यावेळी चौहान यांनी टाटा कंपनीलाही सुनावलं. "टाटा व्यवस्थापनाने कंपनी हाती घेतल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारेल असे माझे मत होते, परंतु तो माझा भ्रम ठरला आहे.

"माझ्या गैरसोयीबद्दल मला चिंता नाही पण प्रवाशांकडून पूर्ण पैसे घेऊन त्यांना अशा सीटवर बसवणे चुकीचे आहे. ही प्रवाशांची फसवणूक नाही का? भविष्यात कोणत्याही प्रवाशाची अशी गैरसोय होऊ नये यासाठी एअर इंडिया व्यवस्थापन पावले उचलेल का? की प्रवाशांना लवकर पोहोचण्याच्या मजबुरीचा फायदा घेत राहील?" असा सवालही चौहान यांनी केला.

Shivraj Singh Chouhan
Marathi Sahitya Sammelan 2025 : मोदींनी उलगडले मराठी भाषेशी संघाचे नाते; दिल्लीतील संमेलनात पंतप्रधानांची मराठीतून फटकेबाजी

एअर इंडियाने मागितली माफी

यानंतर एअर इंडियाने शिवराज सिंह चौहान यांची माफी मागितली. "तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. भविष्यात अशा गोष्टी टाळण्यासाठी आम्ही या घटनेची काळजीपूर्वक दखल घेत आहोत. भविष्यात तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्यास आम्हाला आनंद होईल," असे कंपनीने ट्विट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com