Amit Shah : देशातून नक्षलवादाचा खात्मा कधी होणार? अमित शहांची मोठी घोषणा, तारीखच सांगितली

Naxalism Chief Minister Meeting : दिल्लीत सोमवारी देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक झाली.
Amit shah
Amit shahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : देशातून नक्षलवादाला हद्दपार करण्यासाठी केंद सरकारने कंबर कसली आहे. नक्षलींचा प्रभाव असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मोठी घोषणा केली. मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचा खात्मा होईल, असे शहांनी स्पष्ट केले.

दिल्लीत झालेल्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. बैठकीत बोलताना अमित शाह यांनी युवकांनाही आवाहन केले. ते म्हणाले, नक्षलवादाशी जोडल्या जाणाऱ्या युवकांनी पुढे येत मुख्य प्रवाहात यावे. आपण जॉईंट टास्क फोर्सची स्थापन केली आहे. नक्षलवाद खपवून घेतला जाणार नाही.

Amit shah
Jairam Ramesh : आर्थिक, राजकीय संकटानंतरही श्रीलंकेत जनगणना; पंतप्रधान, भारतात का विलंब करत आहेत?

सरकारने नक्षलवादाविरोधात झिरो टॉलरंन्सचे धोरण अवलंबले आहे. त्यावर सातत्याने काम केले जात आहे. छत्तीसगडमध्ये आमच्या सरकारने नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये विकासाच्या योजनांचा विस्तार केला. आदिवासी आणि मागास भागातील विकासात नक्षली हे सर्वात मोठी अडचण ठरत आहेत, असेही शाह यांनी सांगितले.

नक्षलींचा प्रभाव असलेल्या राज्यांत कायद्याचे राज्य आणणे आणि बेकायदेशीर कारवाया रोखणे, हे आमचे लक्ष्य आहे. नक्षलवादाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात असून मार्च 2026 पर्यंत त्यातून आपण मुक्त होऊ. सध्या सर्वाधिक छत्तीसगढमध्ये ही समस्या आहे, असे शाह यांनी सांगितले.

Amit shah
Assembly Election 2024 : भाजपची सत्ता ‘या’ सहा कारणांमुळे जाणार; काँग्रेसनंही संधीचं सोनं केलं...

छत्तीसगडमध्ये आतापर्यंत 194 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 742 जणांनी आत्मसमर्पण केले आहे. मी नक्षलवाद्यांना पुन्हा आवाहन करतो, त्यांनी शस्त्र खाली ठेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रय़त्न केले जात असल्याचे शाह यांनी सांगितले.

दरम्यान, देशात जवळपास दहा राज्यांमध्ये नक्षलवादी चळवळ पसरली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. नक्षळवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये सातत्याने चकमक उडत असते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com