Bharatpol : फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘भारतपोल’; अमित शहांचा मास्टरस्ट्रोक

Interpol Union Home Minister Amit Shah News : ‘भारतपोल’च्या माध्यमातून फरार गुन्हेगारांपर्यंत पोहचण्यातील अनेक अडथळे दूर होणार आहेत.
Bharatpol, Amit Shah
Bharatpol, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : विदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या इंटरपोल प्रमाणेच आता भारतपोल काम करणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हा मास्टरस्ट्रोक लगावला आहे. त्यांनी आज भारतपोल या पोर्टलचे लोकार्पण करत तपास यंत्रणांना आणखी मजबूत केले आहे.

भारतात गुन्हे करून अनेक आरोपी विदेशात पळून जातात. त्यांना पकडून पुन्हा भारतात आणणे, सहजसोपे नाही. भारतीय पोलिसांना अनेक तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतात. त्यासाठी बराच कालावधीही लागतो. पण आता भारतपोलमुळे हे काम सोपे होणार आहे. गुन्हेगारांविरोधातील कारवाईला वेग येणार आहे. आजपासून त्याची सुरूवात झाली आहे.

Bharatpol, Amit Shah
Sheikh Hasina: शेख हसीना यांचा पाय आणखी खोलात; ICTने उचललं मोठं पाऊलं

भारतपोल कसे काम करणार?

देशातील तपास यंत्रणांची गुन्हेगारांवर सातत्याने करडी नजर असते. पण अनेकदा आरोपी एका राज्यांतून दुसऱ्या राज्यांत जातात. विदेशात पलायन करतात. अशा स्थितीत राज्यातील पोलिसांना दुसऱ्या देशात इंटरपोलची मदत घ्यावी लागते. त्यासाठी पत्रव्यवहार, मेल करणे, मान्यता अशा अनेक तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतात. या कालावधीत आरोपी ठिकाणही बदलू शकतो.

गुन्हेगारांना पकडण्यात होत असलेल्या विलंब भारतपोलमुळे टळणार आहे. भारतात आता आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे नेटवर्क नेस्तनाबूत करून त्यांना पकडण्यासाठी, त्यांच्याविरोधात कारवाईसाठी गृह विभागाने भारतपोल पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल सीबीआयच्या नियंत्रणाखाली असेल. या माध्यमातून देशातील सर्व तपास यंत्रणा एकाच छताखाली जोडल्या गेल्या आहेत.

Bharatpol, Amit Shah
Rahul Gandhi : छत्तीसगढ नक्षली हल्ल्यावर राहुल गांधींकडून शोक व्यक्त; राष्ट्रीय सुरक्षा राखण्याच्या सरकारच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न!

भारतपोलच्या माध्यमातून रेड नोटीस, डिफ्यूजन नोटीस आणि इतर काही इंटरपोल नोटीस जारी करण्याची प्रक्रिया वेगात होईल. त्याचप्रमाणे राज्य पोलिसांना सीबीआयकडूनही तातडीने माहिती मिळवता येणार आहे. एखादा आरोपी विदेशात लपून बसला असेल तर आता थेट भारतपोलवरून पुढील सर्व प्रक्रिया वेगात पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे राज्य पोलिस व सर्वच तपास यंत्रणांवरील ताणही कमी होणार आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com