JP Nadda : जे. पी. नड्डा यांच्यावर संसदेत मोठी जबाबदारी; पियूष गोयल यांची जागा घेणार

Parliament Session Lok Sabha Rajya Sabha Leader of House BJP : जे. पी. नड्डा हे राज्यसभेचे खासदार असून केंद्रीय आरोग्यमंत्रीही आहेत.
JP Nadda
JP NaddaSarkarnama

New Delhi : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर संसदेत मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये आरोग्यमंत्रिपद दिले आहे. त्यानंतर आता त्यांना राज्यसभेत सभागृह नेते बनविण्यात आले आहे.

जे. पी. नड्डा केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची जागा घेतील. गोयल हे मुंबईतून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. ते राज्यसभेचे सदस्य असताना मागील टर्ममध्ये सभागृह नेते होते. त्यांच्याजागी आता ही जबाबदारी नड्डा सांभाळणार आहेत.

भाजपचे अध्यक्ष म्हणून नड्डा यांचा कार्यकाळ सात जानेवारीला संपला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्यांची मुदत पुढील काही दिवसांत संपत आहे. त्याआधीच त्यांना पुन्हा नवीन जबाबदारी देण्यात आली. आहे.

JP Nadda
Varsha Gaikwad : प्रवास तोच, वळण नवे..! वर्षा गायकवाड दिल्लीतही आक्रमक

नड्डा हे मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्येही आरोग्यमंत्री होते. 2019 मध्ये त्यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. त्यानंतर जानेवारी 2020 पासून ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता या पदाचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

63 वर्षीय नड्डा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदतून आपल्या राजकीय वाटचालीला सुरूवात केली. ते 1991 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले. त्यांनी पक्षातील अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. निवडणुकीत अनेक राज्यांचे प्रचारात नेतृत्वही केले आहे. हिमाचल प्रदेशमधील सरकारमध्येही ते मंत्री होते.

JP Nadda
Narendra Modi Vs Rahul Gandhi : राहुल गांधींनी पहिल्या 7 मिनिटांतच मोदींविरोधात टाकला डाव! काय घडलं लोकसभेत?

नवीन अध्यक्ष कोण?

नड्डा यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांची जागा कोण घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्रातील नेते आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. पुढील काही दिवसांत भाजपला नवीन अध्यक्ष मिळू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com