Anurag Thakur
Anurag Thakursarkarnama

Manipur News : विरोधी पक्षांच्या खासदारांचा मणिपूर दौरा केवळ दिखावा; केंद्रीय मंत्री ठाकूरांचा हल्लाबोल

Anurag Thakur News : विरोधी आघाडी 'इंडिया'च्या 20 खासदारांचे एक शिष्टमंडळ मणिपूरला गेले आहे.
Published on

Manipur tour of MPs : मणिपूर हिंसाचारावर रस्त्यावरून संसदेपर्यंत केंद्रातील सत्ताधारी भाजप (BJP) आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. विरोधी आघाडी 'इंडिया'च्या 20 खासदारांचे एक शिष्टमंडळ मणिपूरला गेले आहे. मणिपूरमधून आल्यानंतर हे खासदार राज्यातील समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार आणि संसदेला शिफारस करणार आहेत. विरोधी पक्षाच्या खासदारांचा मणिपूर दौरा हा केवळ दिखावा असल्याचा, आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी केला आहे.

विरोधी आघाडीवर हल्लाबोल करताना ठाकूर म्हणाले, ''I.N.D.I.A.चे काही खासदार मणिपूरला गेले ही निव्वळ लबाडी आहे. त्यांच्या सरकारच्या काळात जेव्हा मणिपूर जळत होते. त्यावेळी हे लोक काहीच बोलले नाही. शेकडो लोक मारले गेले होते, तेव्हाही यांनी तोंड उघडले नाही. तिथे आता हे सदस्य गेले आहेत. मणिपूरला गेलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे (Congress) नेते अधीर रंजन चौधरीही आहेत. जेव्हा ते मणिपूरहून (Manipur) परत येतील तेव्हा मी त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये जाण्याची विनंती करणार आहे.''

Anurag Thakur
Sharad Pawar Visit PM Modi : शरद पवार हे मोदींसाठी पुण्यात थांबणार की केजरीवालांची विंनती मानणार ?

''माझा चौधरी यांना प्रश्न आहे की ते पश्चिम बंगालमधील महिलांवरील गुन्हे आणि हत्यांशी सहमत आहेत का? ममता बॅनर्जींच्या राजवटीत सर्व काही ठीक आहे का? पश्चिम बंगालमधून हजारो लोकांना हाकलून दिले, ते जखमी झाले, 57 हून अधिक लोक मारले गेले, त्यावर बोलणार आहात का? दहशतीच्या माध्यमातून सत्ता निर्माण करण्याचे काम बॅनर्जींच्या राजवटीत सुरु आहे, याचा चौधरी आणि विरोधी पक्षाचे खासदार बोलतील का?'', असे सवाल ठाकूर यांनी केले.

Anurag Thakur
Narendra Modi News : पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याला विरोध; बाबा आढावांच्या नेतृत्वात २६ पक्ष, संघटना ऐकवटल्या

''राजस्थानमध्ये महिलांच्या हत्या होत आहेत. तेथील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. जगभर आपले ज्ञान पसरवणारे राहुल गांधीही तिकडे गेले नाहीत. 'इंडिया'चे 20 सदस्य राजस्थानात येतील का?'' अशा शब्दांत ठाकूर यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला. दरम्यान, 'आदिवासी एकता मार्च' दरम्यान मणिपूरमध्ये हिंसाचार भडकल्यापासून १६० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. यावरुन विरोधी पक्षांनी भाजपला घेरले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com