Chirag Paswan : मंत्रिपदाला लाथ मारेल, म्हणणारे चिराग पासवान आता मोदींविषयी काय म्हणाले?

PM Narendra Modi NDA Government : संविधान आणि आरक्षणासाठी आपण मंत्रिपद सोडू, असे विधान चिराग पासवान यांनी केले होते.
Narendra Modi, Chirag Paswan
Narendra Modi, Chirag PaswanSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी दोन दिवसांपूर्वीर मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर भाष्य केले होते. त्यानंतर त्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या नात्याविषयी विधान केले आहे.

पंतप्रधान मोदींचे ‘हनुमान’ अशी ओळख बनवलेल्या चिराग यांनी संविधान व आरक्षणाला धक्का बसतोय, असे वाटेल त्यावेळी मंत्रिपदाला लाथ मारेन, असे विधान दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे ते एनडीएतून बाहेर पडणार, अशा चर्चांना उधाण आले होते. यावर चिराग यांनी बुधवारी स्पष्टीकरण दिले आहे.

Narendra Modi, Chirag Paswan
BJP Candidate Death : मतदान होताच काश्मीरमध्ये दुर्दैवी घटना; भाजप उमेदवाराचा मृत्यू

चिराग म्हणाले, माझ्या आणि पंतप्रधानांच्या संबंधांविषयी कुणाला त्रास होत असले तर मला आणि माझ्या पंतप्रधानांना कुणीही वेगळे करू शकत नाही. असे कधीच होणार नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. माझे वडील किंवा मी कधीही सत्तेसाठी हपापलेलो नाही.

केवळ सत्तेसाठी कोणत्याही चुकीच्या निर्णयाचे समर्थन करणार नाही. मी आमच्या पंतप्रधानांच्या विचारांना पुढे घेऊन जाईन, असेही चिराग यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या मुल्यांशी समझोता करण्याऐवजी मी मंत्रिपद सोडेन, या विधानावर सुरू झालेल्या चर्चांना चिराग यांनी पूर्णविराम दिला आहे.

Narendra Modi, Chirag Paswan
Caste Census : मुंबईतील ‘INDIA’ च्या बैठकीबाबत केंद्रीय मंत्र्यांचा गौप्यस्फोट; तेव्हा राहुल गांधी गप्प का होते?

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असतील, तोपर्यंत एनडीएमध्ये राहणार असल्याचे विधानही चिराग यांनी केले होते. दरम्यान, चिराग पासवान यांनी मंत्री झाल्यानंतर काही निर्णयांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यूपीएससीच्य लॅटरल भरतीलाही त्यांनी उघडपणे विरोध केला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली.

भाजप नेत्यांकडून लॅटरल भरतीचे समर्थन केले जात होते. पण चिराग यांच्या विरोधानंतर ही प्रक्रिया रद्द झाली आणि भाजप नेत्यांची भाषाही बदलली. वक्फ बोर्ड सुधारित विधेयकालाही चिराग यांचा विरोध असल्याचे मानले जाते. विरोधकांनीही जोर लावल्याने आणि सरकारमधीलही विरोध होत असल्याने सरकारला हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे लागले. त्यामुळे चिराग यांच्या मंत्रिपद सोडण्याच्या विधानावरून तर्कवितर्क लढवले जात होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com