Jyotiraditya Shinde News : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशच्या रिंगणात; आमदारकीचं तिकीट स्वीकारणार?

Jyotiraditya Shinde In Madhya Pradesh Assembly Election : ज्या भागात भाजपला सर्वाधिक आव्हान उभे आहे, त्या ग्वाल्हेर-चंबळ भागामध्ये शिंदे घराण्याचं वर्चस्व...
Jyotiraditya Shinde News
Jyotiraditya Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. भाजप उमेदवारांच्या तिसऱ्या यादीमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना तिकीट दिलं जाण्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे शिवपुरी मतदारसंघामधून अनेकदा आमदार राहिलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आत्या यशोधरा राजे या प्रकृतीच्या कारणामुळे यंदा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत, त्यामुळे त्यांच्या जागी ज्योतिरादित्य शिंदे यांना विधानसभेच्या निवडणुकीला उभं केलं जाण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

उमेदवारांना तिकीट मिळालं नाही की, नाराजीचे सूर उमटत असतात. पण सध्या मध्य प्रदेशात अनेक बड्या मंत्र्यांना खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांनाही विधानसभेसाठी उतरवलं जात आहे. यामुळे तिकीट मिळालं की नाराजी हा नवा पॅटर्न सुरू झाला आहे. याच मालिकेत आता ज्योतिरादित्य शिंदे यांचंही नाव चर्चेेत येत आहे.

Jyotiraditya Shinde News
Rajasthan Politics : मध्य प्रदेश, छत्तीसगडपेक्षा राजस्थानात काँग्रेसला मोठा विजय मिळेल : गेहलोतांचा विश्वास

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आत्या यशोधर शिंदे या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या वेळी निवडणूक लढणार नाहीत, अशी त्यांची इच्छा आहे. ज्या भागात भाजपला सर्वाधिक आव्हान उभे आहे, त्या ग्वाल्हेर-चंबळ भागामध्ये शिंदे घराण्याचं वर्चस्व आहे. त्यामुळे यशोधरा राजे रिंगणात नसतील तर शिंदे परिवारातून कोण रिंगणात असणार याची चर्चा सुरू झाली आहे.

Jyotiraditya Shinde News
Canada-India Dispute : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचं स्वप्न भंगलं; अमेरिकेने दिला जबर धक्का !

यामुळे आता भाजपने तीन केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहेत. त्याप्रमाणे ज्योतिरादित्य शिंदे यांना आता राज्याच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. यामुळे आता ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रातून आता राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

(Edited By Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com