Assembly Session Update : आमदाराचा प्रताप, पान मसाला खाऊन विधानसभेत थुंकले; अध्यक्षांनी झापले

UP Assembly controversy MLA spits in Assembly : उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान एका आमदाराने विधानसभेत थुंकल्याचे समोर आले आहे.
Assembly Session
Assembly SessionSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh Politics : विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना सभागृहात मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहणे, पान, पान मसाला खाणे, तंबाखू खाणे, असंसदीय शब्दांचा वापर करणे अशी कृत्ये आमदारांकडून नेहमीच घडत असतात. आता एक आमदार पान मसाला खाऊन सभागृहात थुंकल्याचे समोर आले आहे. हे पाहून विधानसभा अध्यक्षांनीही चांगलाच धक्का बसला.

उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान एका आमदाराने विधानसभेत थुंकल्याचे समोर आले आहे. विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. मंगळवारी विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी त्यांनी सभागृहाची स्वच्छता करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी सभागृह सुरू झाल्यानंतर अत्यंत कडक शब्दांत आमदारांना सुनावले.

Assembly Session
DK Shivakumar CM Karnataka : ‘’ हवं तर रक्ताने लिहून देतो, डिसेंबरपर्यंत शिवकुमार मुख्यमंत्री बनणार’’ ; काँग्रेस आमदाराचा दावा!

सभागृहाची प्रतिष्ठा आणि स्वच्छता कायम ठेवण्याबाबत महाना यांनी सदस्यांना खडेबोल सुनावले. सभागृहातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर विधानसभा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आली होती. त्यानंतर त्यांनी अध्यक्षांनी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी स्वत: सभागृहात जाऊन त्याठिकाणाची पाहणी केली आणि स्वच्छतेचे आदेश दिले.

कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष म्हणाले, विधानसभेप्रती केवळ एक व्यक्तीच नाही तर सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या कृत्याचा व्हिडीओ उपलब्ध आहे. पण कोणत्याही सदस्याला सार्वजनिक पध्दतीने अपमानित करण्याचा आपला उद्देश नाही. भविष्यात कुणी असे करताना आढळून आल्यास त्यांना तिथे थांबवा, असे आवाहनही त्यांनी आमदारांना केले. 

Assembly Session
Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांनी 4 वाक्यांत विषय संपवला!

स्वत:हून पुढे या!

महाना यांनी संबंधित सदस्यांनी स्वत:हून पुढे येत आपली चूक मान्य करावी, असेही आवाहन केले. त्यांनी असे न केल्यास मी बोलवून घेईन. उत्तर प्रदेश विधानसभा राज्यातील 25 कोटी नागरिकांच्या आस्थेचे प्रतिक आहे. त्याची स्वच्छता आणि मर्यादा राखण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी ताकीदही त्यांनी दिली.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com