New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेतील 56 खासदारांना निरोप देताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे कौतुक केले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात जी प्रतिभा दाखवली ती अद्भूत असल्याचे मोदींनी म्हटले होते. मात्र, त्यानंतर काही तासांतच मनमोहन सिंग यांच्याच कार्यकाळातील आर्थिक बेशिस्तीचा लेखाजोखा मांडणारा व्हाइट पेपर आज लोकसभेत सादर करण्यात आला. (White Paper News)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अंतरिम बजेट मांडताना यूपीए सरकारच्या (UPA Government) कार्यकाळातील कामाबाबतचा व्हाइट पेपर सादर करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आज लोकसभेत व्हाइट पेपर सादर केला. विशेष म्हणजे आजच यूपीए सरकारच्या काळात दहा वर्षे पंतप्रधान राहिलेल्या मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांच्यावर राज्यसभेत स्तुतिसुमने उधळण्यात आली होती. त्यामध्ये पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) सिंग यांचे कौतुक केले होते.
व्हाइट पेपरवर उद्या लोकसभेत आणि शनिवारी राज्यसभेत चर्चा घडवून आणली जाणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील संसदेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. नियोजित वेळापत्रकानुसार हे अधिवेशन शुक्रवारी संपणार होते. पण व्हाइट पेपरसाठी एक दिवसाचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काय आहे व्हाइट पेपरमध्ये?
मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी यूपीएच्या काळात देशासमोरील आर्थिक संकटांचा लेखाजोखा व्हाइट पेपरच्या माध्यमातून संसदेत मांडला जाणार आहे. तसेच ही स्थिती सुधारण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली जाणार आहे. यूपीए सरकारला 2004 मध्ये निरोगी अर्थव्यवस्था मिळाली होती, पण 2014 पर्यंत या सरकारने देशाचा आर्थिक पाया कमजोर केल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.
काँग्रेसचा ब्लॅक पेपर
काँग्रेसकडून व्हाइट पेपरच्या विरोधात आज सकाळीच ब्लॅक पेपर काढला आहे. बेरोजगारी, महागाई आणि उपेक्षित शेतकरी या विषयांवर ‘फोकस’ करत काँग्रेसने ‘ब्लॅक पेपर’ काढला आहे. भाजप नेहमी त्यांच्या यशाचे गुणगान गाते, पण ते त्यांच्या पराभवाबद्दल बोलत नाही. ‘ब्लॅक पेपर’ भाजप सरकारच्या विरोधात काढल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. ‘ब्लॅक पेपर’मध्ये बेरोजगारी हा सर्वांत मोठा मुद्दा आहे. भाजपच्या अपयशाबद्दल जेव्हा बोलतो, तेव्हा त्याला जास्त महत्त्व दिले जात नाही. काँग्रेसने ‘व्हाइट पेपर’ येण्यापूर्वी केवळ ‘ब्लॅक पेपर’ काढल्याचे पोस्टर दाखविले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.