

Middle East tensions : अमेरिका आणि इस्त्राईलकडून आता इराणवर हल्ल्याची तीव्रता वाढविली असून युध्द आणखी भडकले आहे. त्यातच भारतातून मायदेशी परतणाऱ्या युध्दनौकेवर हल्ला झाल्याने इराण चांगलेच भडकले आहे. अमेरिकेच्या पाणबुडीने भारतापासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात युध्दनौकेवर क्षेपणास्त्र डागले. या ह्ल्ल्यानंतर युध्दनौका समुद्रात बुडाली आहे.
अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर श्रीलंका तटरक्षक दलाने बचावकार्य सुरू केले होते. त्यामध्ये जहाजावारील १३० जणांपैकी केवळ ३२ नाविकांना वाचविण्यात यश आल्याचे समजते. तर ८७ जणांचा मृतदेह आढळून आला असून आणखी काही जण बेपत्ता आहे. या घटनेनंतर इराणने संताप व्यक्त केला आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री सईद अब्बास अरागची यांनी थेट बदल्याची भाषा केली आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, इराणच्या तटापासून २ हजार मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय समुद्री क्षेत्रात अत्याचार केला आहे. IRIS डेना ही युध्दनौका भारताच्या नौदलाची गेस्ट होती. त्यावर १३० नाविक होते. अमेरिकेने कोणतीही वॉर्निंग न देता हल्ला केला.
माझे शब्द लक्षात ठेवा, अमेरिकेला याचा मोठा पश्चाताप होईल, असा निर्वाणीचा इशारा देत अरागची यांनी थेट बदल्याची भाषा केली आहे. त्यामुळे युध्द आणखी भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इराणची युध्दनौका काही आठवड्यांपूर्वी विशाखापट्टनमध्ये आयोजित MILAN 2026 आणि International Fleet Review 2026 मध्ये सहभाग घेण्यासाठी आली होती. त्यानंतर हे जहाज इराणच्या दिशेने निघाले होते.
बुधवारी श्रीलंकेच्या दक्षिणेकडील तटापासून सुमारे ४० समुद्री मैल अंतरावर असताना युध्दनौकेवर हल्ला झाला. अमेरिकेनेही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. युध्दनौका समुद्रात बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीलंकेकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. यादरम्यान ३२ जणांना वाचविण्यात यश आले. बचावकार्य सुरू असतानाच जहाज समुद्रात बुडाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.