Voting in India : ट्रम्प यांना अमेरिकेच्या दुतावासानेच आपटले तोंडावर; भारतातील मतदानाबाबतच्या दाव्याची झाली पोलखोल

US Embassy Denies Trump’s $21 Million Claim : भारतात मतदानाबाबतची सर्व प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोगामार्फतच राबविली जाते. त्यासाठी कोणत्याही परकीय संस्था किंवा संघटनांकडून निधी घेतला जात नाही.
Donald Trump
Donald Trump Sarkarnama
Published on
Updated on

Clarification on USAID’s Role in India : भारतावर टेरिफ बॉम्ब टाकणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तोंडावर आपटले आहेत. भारत आणि पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या संघर्ष आपल्याच मध्यस्थीमुळे थांबल्याचा दावा त्यांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेतच हा दावा फेटाळून लावला आहे. त्यानंतर ट्रम्प यांच्या आणखी एका दाव्याची पोलखोल झाली आहे.

ट्रम्प यांच्याकडून भारतातील मतदानाबाबत काही महिन्यांपूर्वी मोठा दावा करण्यात आला होता. हा दावा आता अमेरिकेच्या दुतावासाने खोटा ठरवला आहे. भारतात मतदान वाढविण्यासाठी अमेरिकेने 21 मिलियन डॉलर निधी दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प यांचा दावा केंद्र सरकारने यापूर्वीच खोडून काढला होता. त्यावर आता खुद्द अमेरिकेच्या दुतावासाने मोहोर उमटवत ट्रम्प यांना खोटे पाडले आहे.

दुतावासाने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला लिखितपणे ही माहिती दिली आहे. 2014 पासून आतापर्यंत असा कोणताही निधी किंवा प्रोजेक्टच झाला नसल्याचे दुतावासाने स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या USAID या प्रोजेक्टअंतर्गत भारतातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आतापर्यंत 21 मिलियन डॉलर (सुमारे 175 कोटी) एवढा निधी देण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

Donald Trump
PM Narendra Modi News : राहुल गांधींना काँग्रेसमधील युवा नेत्यांमुळे वाटतेय असुरक्षित; चहापानावेळी पंतप्रधान मोदींची गुगली

ट्रम्प यांच्या या दाव्याची परराष्ट्र मंत्रालयाने हवा काढली आहे. संसदेत परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकी दुतावासाचे निवेदनच सादर केले. यामध्ये दुतावासाने स्पष्ट केले आहे की, ‘असा कोणताही निधी भारतात आलेला नाही किंवा USAID/INDIA ने मागील एका दशकापासून भारतात मतदान वाढविण्यासाठी कोणताही प्रोजेक्ट राबविलेला नाही.’ त्याचप्रमाणे भारतात 1 जुलै 2025 पासून USAID बंद करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Donald Trump
BEST Election Result : अंगावरचा गुलाल निघण्याआधीच बेस्ट कर्मचाऱ्यांना धक्का? शशांक राव तर ‘स्टार प्रचारक’…

दरम्यान, भारतात मतदानाबाबतची सर्व प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोगामार्फतच राबविली जाते. त्यासाठी कोणत्याही परकीय संस्था किंवा संघटनांकडून निधी घेतला जात नाही. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडूनच प्रयत्न केले जातात. परराष्ट्र मंत्रालयानेही संसदेत स्पष्ट केले आहे की, भारताची लोकशाही कोणत्याही परकीय निधीवर चालत नाही. मतदानाचे क्रेडिट केवळ जनता आणि आयोगालाच जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com