
US judiciary and Trump policies : अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने खराब कामगिरी करणाऱ्या सरकारी कर्माचाऱ्यांना काढून टाकण्याचे धोरण स्वीकारले होते. यातून हजारो कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली होती.
कर्मचारी संघटनेने याविरोधात अमेरिका न्यायालयात धाव घेतली होती. अमेरिका न्यायालयाने याची गंभीर दखल घेत, बडतर्फीची कारवाई केलेल्या हजारो फेडरल कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करण्याचा आदेश दिला आहे. अमेरिका न्यायालयाचा आदेश म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी प्रशासनाला मोठा झटका असून चाप देखील असल्याचे बोलले जात आहे.
अमेरिका न्यायालयाने (Court) ट्रेझरी, वेटरन्स अफेयर्स, कृषी, संरक्षण, ऊर्जा आणि अंतर्गत विभागांसह सहा फेडरल एजन्सींना हा आदेश दिला आहे. या कर्मचाऱ्यांना ‘खराब कामगिरी’च्या आधारे काढून टाकण्यात आले होते. मात्र न्यायालयाने हे कारण निव्वळ ढोंगी असल्याचे म्हटले आहे.
कर्मचारी संघटनांने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विल्यम अलसूप यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायमूर्ती विल्यम अलसूप यांनी यावर निर्णय दिला. न्यायाधीशांनी निर्णय देताना, ट्रम्प प्रशासनाने खराब कामगिरीच्या (Workers) आधारे कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने काढून टाकले आहे. ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या वास्तविक कामगिरीवर आधारित नाही.
यूएसच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील कोर्टाने सरकार चांगल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे. त्याला कामगिरीचा आधार देताना, खोटे दाखले देत आहे. ही कारवाई चुकीचीच आहे. फेडरल एजन्सींना अयोग्यरित्या काढून टाकलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे निर्देश दिले.
व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प परतल्यानंतर अमेरिकन सरकारमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत खर्च वाचवण्यासाठी कठोर पावले उचलली. यातून हजारो फेडरल कर्मचाऱ्यांना त्यांना नोकरीतून काढून टाकले. मात्र, त्यांच्या या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. अनेक न्यायालयाने कर्मचाऱ्यांना दिलासा देत या निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेशही दिले. या आदेशमुळे ट्रम्प यांच्या सरकारी संरचनांमध्ये कपात करण्याच्या धोरणांना मोठा धक्का मानला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.