
New Delhi News : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बॅंकेने सर्कलनिहाय कार्यकारी पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. या भरतीसाठी कोणत्याही परीक्षेची गरज नाही. कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता असून त्यातील गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाणार आहे.
बँकेच्या जाहिरातीनुसार, 1 मार्चपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. इच्छूकांना 21 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यांना www.ippbonline.com या अधिकृत संकेतस्थळावर अर्जाची लिंक उपलब्ध आहे. ही भरती प्रक्रिया केंद्र सरकारच्या टपाल विभागामार्फत राबवली जात आहे. प्रत्येक राज्य (सर्कल) निहाय पदे देण्यात आली आहेत.
जाहिरातीनुसार, महाराष्ट्रात तीन पदे तर गोव्यात एक पद भरले जाणार आहे. छत्तीसगड, आसाम, बिहारमध्ये प्रत्येकी तीन पदे आहेत. तर सर्वाधिक सहा पदे गुजरातमध्ये भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे हरियाणा, पंजाप, राज्यस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एक पद आहे.
उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रत्येकी दोन पदांची भरती होईल. ईशान्यकडील राज्यांमध्ये एकूण 20 पदे भरली जाणार आहेत. तमिळनाडू, केरळ आणि पुद्दचेरीमध्ये चार पदांसाठी निवड केली जाईल. ज्या राज्याचे डोमिसाईल प्रमाणपत्र आहे, अशाच उमेदवारांना संबंधित राज्यात प्राधान्य दिले जाणार आहे. ही भरती कंत्राटी तत्वावर होणार आहे.
भरतीविषयी अधिक माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दरम्यान, बँकेने जॉब स्कॅमपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. भरती प्रक्रियेच्या कोणत्याही स्तरावर अर्जाचे शुल्क वगळता इतर कोणत्याही कारणासाठी पैसे घेतले जात नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे. तसेच भरतीबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळावर पडताळणी करावी, असे आवाहनही बँकेने केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.