Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘टेरिफ वॉर’ संपूर्ण जगाला हादरा देणार; नव्या विधानामुळे खळबळ...

Global Economy and US Tariff Policy US Tariffs on All Countries 2025 : डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर भारतासह अनेक देशांवर टेरिफ लावण्याचा इशारा दिला होता.
Donald Trump
Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगभरातील देशांचे टेन्शन वाढवले आहे. सुरूवातीला आयात मालावरील शुल्कावरून ठराविक देशांनाच लक्ष्य करणाऱ्या ट्रम्प यांनी आता सर्व देशांना ‘टेरिफ वॉर’मध्ये खेचले आहे. आगामी काळात सर्वच देशांवर शुल्क लावले जाणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे.

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर भारतासह अनेक देशांवर टेरिफ लावण्याचा इशारा दिला होता. त्याची अंमलबजावणी 2 एप्रिलपासून होणार आहे. अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या मालावर जेवढे शुल्क आकारले जाते, तेवढेच शुल्क संबंधित देशांतून अमेरिकेत येणाऱ्या मालावरही आकारले जाणार आहे.

Donald Trump
BJP Politics : थेट मोदींना आव्हान देत प्रदेश नेतृत्वावर हल्ला; अशी आहे हकालपट्टी झालेल्या आमदार पाटलांची राजकीय कारकीर्द… 

ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टेरिफचा हा इशारा सुरूवातीला काही ठराविक देशांनाच दिला होता. या देशांनी अमेरिकेला अनेक वर्षे फसवल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र, आता त्यांनी सर्वच देशांवर शुल्क लावणार असल्याचे जाहीर केल्याने जगाला हादरा बसला आहे. अनेक देशांतून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालाला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

मीडियाशी बोलताना ट्रम्प म्हणाले, आजपर्यंतच्या इतिहास कोणत्याही देशाने कधीही एवढी फसवणूक केली नाही, जेवढी या देशांनी केली आहे. आम्ही त्यांच्यासोबत खूप चांगले वागत आहोत. पण त्यानंतरही त्यातून मिळणारी रक्कम देशासाठी मोठी आहे. सर्व सर्वच देशांपासून सुरूवात करणार आहोत.

Donald Trump
BJP MP News : सिंह कधीही कुत्र्यांची शिकार करत नाही! दलित IAS बाबत भाजप खासदार बरळले; वाद पेटला

केवळ काही मुठभर देशांसाठी हे टेरिफ आहे, असे नाही. मी 10 किंवा 15 देशांविषयी बोलता नाही. मी सर्वच देशांबाबत हे बोलत आहे. कोणतीही कटऑफ केली जाणार नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे आता जगातील सर्वच देशांची चिंता वाढली आहे.

येत्या 2 एप्रिलपासून नवे टेरिफ लागू होणार आहे. कोणत्या देशातून आयात होणाऱ्या मालावर किती टेरिफ लागणार, याबाबत संभ्रम वाढला आहे. ट्रम्प यांनी सरसकट सर्वच देशांबाबत हा निर्णय लागू केल्यास अनेक कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. संपूर्ण जगाच्या बाजारावर त्याचा परिणाम जाणवू शकतो.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com