
US News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सत्ता सोडण्यापूर्वी आपल्या मुलाला विविध आरोपांमध्ये माफी दिली आहे. बायडेन यांच्या या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. करचोरी, बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्रे बाळगणे, सरकारी पैशांचा गैरवापर असे विविध आरोप त्यांच्या मुलावर होते. दरम्यान, नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या डोनाल्ड टॅम्प यांनी या निर्णयाला 'न्यायाचा गर्भपात' म्हणत टीका केली आहे.
बायडेन यांनी रविवारी अधिकृतपणे एक निवेदन प्रसिध्द करत मुलाला माफी दिल्याची माहिती दिली आहे. कुटुंबासाठी आपल्या पदाच्या अधिकारांचा वापर करणार नाही, असे बायडेन यांनी यापूर्वी म्हटले होते. मात्र, त्यांनी आपला मुलगा जोसेफ हंटर यांना सर्व आरोपातून माफी देत यू टर्न घेतल्याची चर्चा सुरू आहे.
बायडेन यांनी प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज मी माझा मुलगा हंटरसाठी एका माफीवर सही केली आहे. मी राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा म्हटले होते की, मी न्याय विभागाने घेतलेल्या निर्णयांमध्ये हस्त७प करणार नाही. मी माझे प्रत्येक आश्वासन पाळले आहे. पण माझ्या मुलाला चुकीच्या पध्दतीने अडकवण्यात आले, त्याच्यावर खटले चालवण्यात आले.
मुलावर लावण्यात आलेले आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित होते. जेणेकरून त्याच्यामाध्यमातून माझ्यावर टीका करता येईल आणि माझ्या निवडणूक प्रक्रियेला विरोध करता येईल, असे बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. मी माझ्या संपूर्ण करिअरमध्ये अमेरिकी लोकांना केवळ सत्य सांगण्याचा नियम पाळला आहे. मला न्यायप्रणालीवर पूर्ण विस्वास आहे. पण राजकारणाने या प्रक्रियेतही घुसखोरी केल्याचे मला दिसले, असे बायडेन म्हणाले आहे.
एक वडील आणि राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय का घेतला, हे लोकांना समजेल, असे अमेरिकेतील जनतेला उद्देशून बायडेन यांनी म्हटले आहे. दरम्यान, बायडेन यांच्या मुलावर करचोरी, बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्रे बाळगणे, सरकारी पैशांचा गैरवापर, खोटी साक्ष दणे असे आरोप आहेत. विशेष म्हणजे बायडेन यांच्या मुलाने करचोरी आणि बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्रे बाळगल्याचे आरोप मान्य केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.