US Presidential Election 2024 : ट्रम्प यांच्यावरील हल्ला निवडणुकीला देणार कलाटणी; बायडेन मोठा निर्णय घेणार?

Joe Biden Donald Trump US President : माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट असल्याची चर्चा आहे.
Joe Biden, Donald Trump
Joe Biden, Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. माजी राष्ट्राध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर डेमोक्रेटिक पक्षाकडून मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे.

ट्रम्प यांच्याविरोधात विद्यमान राष्ट्राध्यक्ष व डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जो बायडेन निवडणुकीच्या रिंगणात असतील, अशी आतापर्यंत चर्चा होती. पण पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांच्या नावाबाबत सहमती होत नसल्याचे सांगितले जात आहे. बायडेन यांना उमेदवारी दिल्यास विजय कठीण असल्याचे या नेत्यांना वाटते.

Joe Biden, Donald Trump
Assam Muslim Marriage Act : आसाम सरकारने घेतला मोठा निर्णय! ; मुस्लिम विवाह अन् तलाक कायदा रद्द

डेमोक्रेटिक पक्षाकडून पुढील दोन-तीन दिवसांत अधिकृतपणे उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. प्रामुख्याने माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, नॅन्सी पेलोसी या नेत्यांनी बायडेन यांच्या नावावर फुली मारली आहे. ट्रम्प यांच्यासोबत समोरासमोर झालेल्या चर्चेदरम्यान बायडेन फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यातच ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर त्यांच्याविषयी सहानुभूती वाढल्याची चर्चा आहे. त्याचीही धास्ती डेमोक्रेटिक पक्षाने घेतल्याचे दिसते.

बायडेन यांना कोरोना संसर्ग झाला असल्याने ते सध्या घरीच आराम करत आहेत. ते 81 वर्षांचे असून त्यांचेही वयही त्यांना साथ देत नाही. आजारपणाबाबत सातत्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे बायडेन यांनी स्वत:हून निवडणुकीत माघार घ्यावी, अशी मागणी पक्षातील काही नेते करू लागले आहेत. त्यांची मनधरणी सुरू असल्याचेही वृत्त आहे.

Joe Biden, Donald Trump
Assam Muslim Marriage Act : आसाम सरकारने घेतला मोठा निर्णय! ; मुस्लिम विवाह अन् तलाक कायदा रद्द

ट्रम्प आणि बायडेन अशी लढत झाल्यास डेमोक्रेटिक पक्षाला फटका बसू शकतो. ट्रम्प यांचे पारडे सध्या तरी जड वाटत असल्याचे पक्षातील काही नेत्यांचे मत झाले आहे. तर काही नेत्यांकडून मात्र बायडेन यांचे समर्थन केले जात आहे. त्यांनी राष्ट्राध्यक्ष असताना केलेल्या कामाचा हवाला त्यासाठी दिला जात आहे. त्यामुळे आता पुढील दोन-तीन दिवसांत ट्रम्प यांच्याविरोधात कोण लढणार, हे स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com