US Presidential Election: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान पार पडलं असून आता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगाचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं आहे.
सध्याच्या ताज्या आकडेवारीनुसार रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं पारडं जड दिसत आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस या पिछाडीवर आहेत.
डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय वंशाच्या असणाऱ्या कमला हॅरीस (Kamala Harris) यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत आहे. या दोघांनाही एक्झिट पोलमध्ये जनतेने समान कौल दिला आहे. तर आता या निवडणुकीचा (Election Result) निकाल समोर येऊ लागला आहे.
अमेरिकेच्या (America) अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीचे आकडे वेगाने बदलत असून ताज्या आकडेवारीनुसार डोनाल्ड ट्रम्प हे 210 जागांवर आघाडीवर आहेत. तर डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस पिछाडीवर आहेत.
कमला हॅरिस या 112 जागांवर अडकल्या आहेत. तर ट्रम्प यांच्या जागांमध्ये कमालीची वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आताची आकडेवारी ट्रम यांना विजयाच्या दिशेने नेणारी असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या निवडणुकीत कोण विजयी होणार? हे पूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.