US India trade : ज्याची भीती तेच झालं! भारत-अमेरिकेची व्यापार चर्चा रखडणार; 'तो' महत्त्वाचा दौरा अमेरिकेकडून रद्द

Donald Trump tariff on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादले आहे. यापैकी 25 टक्के टॅरिफ रशियाकडून तेल खरेदी केल्या प्रकरणी लादण्यात आलं आहे. 27 ऑगस्टपासून अतिरिक्त टॅरिफ भारतावर लागू होणार आहे.
Narendra Modi, Donald Trump
US President Donald Trump imposed a 50% tariff on India, including 25% on Russian oil imports, creating fresh challenges for India’s trade relations.Sarkarnama
Published on
Updated on

US Tariff on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादले आहे. यापैकी 25 टक्के टॅरिफ रशियाकडून तेल खरेदी केल्या प्रकरणी लादण्यात आलं आहे. 27 ऑगस्टपासून अतिरिक्त टॅरिफ भारतावर लागू होणार आहे.

मात्र, अमेरिकेने लागू केलेले टॅरिफ अन्यायकारक असल्याचं भारताने म्हटलं आहे. दरम्यान, टॅरिफ संदर्भात काही चर्चा होऊन ते कमी होण्याची शक्यता भारताला होती. मात्र, ती आशा देखील मावळली आहे. कारण अमेरिकेचे व्यापारविषयक एक पथक भारत दौऱ्यावर येणार होते.

मात्र, वॉशिंग्टन डीसीच्या या अधिकाऱ्यांचा भारत दौरा अमेरिकेने सध्या थांबवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी भारताला आणखी एक धक्का दिल्याचं बोललं जात आहे. हे पथक भारतात आलं नाही तर टॅरिफ संदर्भातील चर्चा रखडणार असून त्यामुळे टॅरिफपासून भारताला कोणताही दिलासा मिळणार नसल्याचं बोललं जात आहे.

Narendra Modi, Donald Trump
Sharad Pawar : खासगी कारखान्यांना कामगारांची आस्था उरलेली नाही; साखर उद्योग संकटात येण्याची शरद पवारांनी व्यक्त केली भीती

नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी दोन्ही देशांमधील व्यापार करारा संदर्भात वाटाघाटी सुरू केल्या होत्या. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापारी चर्चेच्या 5 फेऱ्या देखील झाल्या. तर उर्वरीत सहाव्या फेरीसाठी अमेरिकेचे व्यापारविषयक पथक ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भारतात येणार होते.

मात्र, आता हा दौरा थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा दौरा रद्द झाल्यास अमेरिकेने भारतावर लादलेला अतिरिक्त टॅरिफ कोणत्याही चर्चेविना 27 ऑगस्टपासून लागू होईल. त्यामुळे बैठक पुढे ढकलणे म्हणजे हा कर असाच लागू करण्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे.

Narendra Modi, Donald Trump
Sharad Pawar : 'होय वसंतदादांचं सरकार मीच पाडलं..., पण का?' पहिल्यांदाच जाहीर कबुली देत शरद पवारांनी सांगितलं 70 च्या दशकातील राजकारण

दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही नेत्यांमध्ये 15 ऑगस्ट रोजी बैठक एक पार पडली. या बैठकीत रशिया-युक्रेन युद्धबंदी बाबत ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे भारतावर लादलेले टॅरिफ कमी होण्याची शक्यता नाही. कारण या नेत्यांच्या बैठकीतून काही गोष्टींवर ठोस तोडगा निघाला नाही तर भारतावरील दुसऱ्या टप्प्यातील टॅरिफ आणखी वाढू शकतो, असा इशारा अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी या बैठकीआधीच दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com