.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Uttar Pradesh : उत्तर प्रदेश विधानसभेत गुरूवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरोधकांवर चांगलेच संतापले. अयोध्येतील 12 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावरून त्यांनी स्थानिक खासदारांसह समाजवादी पक्षावरही जोरदार निशाणा साधला.
घटनेवर बोलताना योगी म्हणाले, ही घटना गंभीर आहे. बलात्कार प्रकरणात सहभागी व्यक्ती फैजाबादच्या खासदारांसोबत असतो. त्यांच्या टीमचा तो सदस्य आहे. अयोध्येच्या खासदारांसोबत तो राहतो, खातो-पितो. पण त्यानंतरही सपाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कोणती अडचण आहे, असा सवाल योगींनी उपस्थित केला.
मी इथे नोकरी करण्यासाठी आलेलो नाही. मला प्रतिष्ठा हवी असती तर ती मठातही मिळाली असती. तुम्हाला बुलडोझरची भीती वाटते. पण हा बुलडोझर निर्दोष लोकांसाठी नाही. राज्यातील युवकांच्या भविष्याशी खेळणारे, व्यापारी आणि महिलांना त्रास देतात, जे राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी आहे, असे योगी म्हणाले.
माझे कर्तव्य मी पार पाडत आहे. मी नोकरी करण्यासाठी आलेलो नाही. मुळीच नाही. मी इथे जे चुकीचे करतील त्यांना ते भोगावे लागावे, यासाठी आलो आहे. ही लढाई साधी लढाई नाही. ही प्रतिष्ठेची लढाई नाही, असे योगींनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी योगींविरोधात उघडपणे आघाडी उघडल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर योगींनी विधानसभेत गुरूवारी केलेल्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. सपाच्या खांद्यावर बंदूक ठेवत त्यांनी पक्षातील विरोधकांवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. तसेच अयोध्येतील सपाचे खासदार अवधेश प्रसाद यांनाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.