काँग्रेसच्या महिला नेत्यावर गोळीबार; पंतप्रधान मोदींना दाखवला होता काळा झेंडा

गोळीबाराच्या घटनेमुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
Rita Yadav

Rita Yadav

Sarkarnama

Published on
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यक्रमादरम्यान काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेसच्या (Congress) नेत्या रीटा यादव (Rita Yadav) यांच्यावर गोळीबार करण्याचा आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर जिल्ह्यात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

सुलतानपूर येथील लखनऊ-वाराणसी या चारपदरी रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी यादव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यादव या सोमवारी पक्षाच्या कार्यालयात बैठकीसाठी आल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास त्या कारमधून घरी जाण्यासाठी निघाल्या. त्यांची गाडी पुलाजवळ येतात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांची गाडी थांबवत गोळीबार केला.

<div class="paragraphs"><p>Rita Yadav</p></div>
महाविकास आघाडीची गोव्यातही हवा; राजकीय हालचालींना वेग

त्यानंतर चालकाने तातडीने यादव यांना रुग्णालयात नेले. सुदैवाने यादव यांना गंभीर दुखापत झाली नसून पायला गोळी लागली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत शोधमोहिम सुरू केली आहे. यादव या समाजवादी पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झाल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>Rita Yadav</p></div>
निमित्त महापौर पदाच्या निवडणुकीचं; काँग्रेसला मिळणार नवा राजकीय भिडू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 16 नोव्हेंबर रोजी पूर्वांचल एक्सप्रेसवे च्या उदघाटनप्रसंगी सभा झाली होती. यावेळी यादव यांनी मोदींना काळा झेंडा दाखवला होत्या. त्यानंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. यावेळी सुरक्षारक्षकांनी यादव यांना गर्दीतून बाहेर काढत त्यांना वेगळे ठेवले होते. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com