Mukhtar Ansari Dies: माफिया मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Mukhtar Ansari Death News : उत्तर प्रदेशच्या बांदा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला माफिया डॉन मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला आहे. मुख्तार अन्सारीला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तो तुरुंगात बेशुद्ध अवस्थेत पडला होता.
Mukhtar Ansari Dead
Mukhtar Ansari DeadSarkarnama
Published on
Updated on

Mukhtar Ansari Death Heart Attack : उत्तर प्रदेशच्या बांदा जेलमध्ये (Banda Jail of Uttar Pradesh) शिक्षा भोगत असलेला माफिया डॉन मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला आहे. मुख्तार अन्सारीला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तो तुरुंगात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्यानंतर तुरुंगातील अधिकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखलं केले. त्याला मोठ्या फौजफाट्यासह रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान अन्सारी (Mukhtar Ansari Dies of Cardiac Arrest) याचा मृत्यू झाला.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुख्तारला आयसीयूमधून सीसीयूमध्ये दाखल करावे लागणार होते. इथे त्याच्यावर उपचार करण्यासाठी 9 डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली होती. मात्र, त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मंगळवारी त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचारानंतर त्याला त्याच दिवशी तुरुंगात पाठवले होते. बुधवारी तुरुंगात त्यांच्या प्रकृतीची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये सर्व काही सामान्य असल्याचे आढळून आले होते. परंतु आज तुरुंगातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यान अखेर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

(ताज्या बातम्या)

Mukhtar Ansari Dead
PM Narendra Modi News : सरन्यायाधीश चंद्रचूड यांना 600 वकिलांचे पत्र; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया...

60 वर्षांचा मुख्तार याने सुनावणीदरम्यान न्यायालयात आरोप केला होता की, तुरुंगात आपली हत्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्या जेवणात स्लो पॉईझन (Slow Poison) दिले जात असल्याने त्यांची प्रकृती बिघडत आहे. दरम्यान, एमपीएमएलए न्यायालयानेही या प्रकरणी तुरुंग प्रशासनाकडून अहवाल मागवला होता.

मुख्तारच्या मृत्यूनंतर गाझीपूर आणि मऊसह इतर संवेदनशील जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. मऊ, बांदा आणि गाझीपूरमध्ये (Ghazipur) कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

(Edited By - Jagdish Patil)

R

Mukhtar Ansari Dead
Arvind Kejriwal News : केजरीवाल हेच CM राहणार; कोर्टाकडून शिक्कामोर्तब, पण 1 एप्रिलपर्यंत जेलमध्येच

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com