Arvind Kejriwal News : केजरीवाल हेच CM राहणार; कोर्टाकडून शिक्कामोर्तब, पण 1 एप्रिलपर्यंत जेलमध्येच

Delhi Liquor Scam Case : केजरीवालांना मुख्यमंत्रिपदावरून हटवावे, या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पण ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाने आज दिलासा दिला आहे. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी केजरीवाल हेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर दुसरीकडे मात्र दिल्लीतील स्थानिक कोर्टाने त्यांच्या ईडी कोठडीत एक एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे केजरीवालांना जेलमध्येच राहावे लागणार आहे.

अटक झाल्यानंतरही केजरीवालांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही. ते जेलमधूनच सरकार चालवत असल्याचा दावा आपच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यांनी जेलमधून दोन आदेशही दिल्याचा दावा केजरीवाल सरकारमधील मंत्र्यांकडून केला जात आहे. यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. या प्रकरणी सुरजित सिंह यादव यांनी दिल्ली हायकोर्टायत जनहित याचिका दाखल केली होती.

Arvind Kejriwal
Varun Gandhi News : कसलीही किंमत मोजावी लागली तरी..! उमेदवारी नाकारल्यानंतर वरुण गांधींचं भावनिक पत्र

याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान यामध्ये न्यायालयीन हस्तक्षेपाची आवश्यकता नसल्याचे कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले. यामध्ये काही संविधानिक अडचणी असतील तर नायब राज्यपाल ते पाहतील. त्यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती निर्णय घेतील, असेही कोर्टाकडून सांगण्यात आले. यामध्ये कोर्टाने आदेश द्यावेत, असा हा विषय नसल्याचे सांगत कोर्टाने याचिका फेटाळून लावली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केजरीवालांना एक एप्रिलपर्यंत कोठडी

केजरीवालांच्या ईडी कोठडीवर आज दिल्लीतून राऊज एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टात बोलताना केजरीवाल म्हणाले, शरद रेड्डी याने जेलमधून बाहेर गेल्यानंतर भाजपला 55 कोटींची देणगी दिली. अशा परिस्थितीत हे सर्वजण आपला संपवू पाहत आहेत आणि दुसरीकडे खंडणी वसूल करत आहेत. हे रॅकेट असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. सात जबाबांपैकी सहामध्ये माझे नाव नाही. जबाबात माझे नाव येताच रेड्डीला सोडण्यात आले, असा आरोप केजरीवालांनी केला. 

कथित घोटाळा 100 कोटींचा सांगितला जात आहे. मग एवढे पैसे गेले कुठे? खरेतर घोटाळा ईडीच्या चौकशीनंतर सुरू होतो. ईडीचे दोन हेतू आहेत. एक म्हणजे आपला संपवणे आणि दुसरे वसुली रॅकेट चालवणे, असेही केजरीवाल कोर्टात म्हणाले. ईडीनेही केजरीवालांविरोधात शंभर कोटींचे लाच घेतल्याचे पुरावे असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने केजरीवालांच्या कोठडीत एक एप्रिलपर्यंत वाढ केली.

R

Arvind Kejriwal
Nirmala Sitharaman News : पैशांअभावी निवडणूक लढण्यास नकार; किती आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची संपत्ती?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com