PM Narendra Modi News : सरन्यायाधीश चंद्रचूड यांना 600 वकिलांचे पत्र; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया...

CJI Dhananjay Chandrachud News : ज्येष्ठ विधिज्ञ हरश साळवे यांच्यासह सुमारे 600 वकिलांनी एक समूह राजकीय अजेंडाच्या आधारावर न्यायपालिकेवर दबाव टाकण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
CJI Dhananjay Chandrachud, PM Narendra Modi
CJI Dhananjay Chandrachud, PM Narendra ModiSarkarnama

New Delhi News : बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांसह ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे आणि जवळपास 600 वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये वकिलांच्या एका समूहावर थेट आरोप करण्यात आले आहेत. एका स्वार्थी समूहाकडून राजकीय अजेंड्याच्या आधारावर न्यायपालिकावर दबाव टाकला जात आहे. न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. या पत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi News) प्रतिक्रिया दिली आहे.

वकिलांनी 26 मार्च रोजी हे पत्र लिहिले आहे. भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप असलेल्या राजकीय व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये विशिष्ट समूहाकडून दबावाची रणनीती आखली जात आहे. हे न्यायदान करणाऱ्या न्यायालयांसाठी (Judiciary) हानीकारक आहे. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो. ते दिवसा राजकीय नेत्यांचा बचाव करतात आणि रात्री मीडियाच्या माध्यमातून न्यायाधीशांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

CJI Dhananjay Chandrachud, PM Narendra Modi
Jagan Mohan Reddy News : एका ‘जगन’ विरोधात दोन बहिणींसह सगळे एकत्र!

वकिलांच्या एका समूहावर या पत्राच्या माध्यमातून निशाणा साधण्यात आला आहे. पत्रामध्ये कोणत्याही विशिष्ट प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, या पत्राच्या टायमिंगवरून चर्चांना उधाण आले आहे. सध्या विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून, काहीजण तुरुंगात आहेत. काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये काही राजकीय पक्षांशी संबंधित वकिलांचाही समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदी म्हणतात...

पंतप्रधान मोदींनी वकिलांच्या पत्राच्या अनुषंगाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, दुसऱ्यांना घाबरवणे आणि धमकावणे ही काँग्रेसची (Congress) जुनी संस्कृती आहे. पाच दशकांपूर्वी ते न्यायपालिकेच्या कटिबद्धतेवर बोलत होते. त्यांना स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्यांची कटिबद्धता हवी असते. राष्ट्रपती त्यांना काहीच देणेघेणे नाही. भारतातील 140 कोटी जनता त्यांना नाकारत आहे, यात काही आश्चर्य वाटत नाही.

काँग्रेसकडून पलटवार

पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेवर काँग्रेसकडून पलटवार करण्यात आला आहे. पक्षाचे नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी म्हटले आहे की, मागील काही दिवसांत सुप्रीम कोर्टाने पंतप्रधानांना काही झटके दिले आहेत. निवडणूक रोखे योजना हे त्याचे एक उदाहरण आहे. मागील दहा वर्षांत पंतप्रधानांनी विकृतीकरण, तोडणे, लक्ष विचलित करणे आणि बदनामी हेच केले. देशातील 140 कोटी जनता त्यांना करारा जवाब देण्यासाठी वाट पाहत आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

R

CJI Dhananjay Chandrachud, PM Narendra Modi
Arvind Kejriwal News : केजरीवाल हेच CM राहणार; कोर्टाकडून शिक्कामोर्तब, पण 1 एप्रिलपर्यंत जेलमध्येच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com