NCP News : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह वाद, सर्वोच्च न्यायालयात 'या' न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आज सुनावणी

NCP Party Supreme Court Hearing : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं न्यायालयात धाव घेतली होती.
Sharad Pawar | Ajit Pawar
Sharad Pawar | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलं होतं. या निर्णयाविरोधात शरद पवार ( Sharad Pawar ) गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज सोमवारी ( 19 फेब्रुवारी ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sharad Pawar | Ajit Pawar
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेंना मोठं चॅलेंज; 'राजीनामा द्या अन्...'

अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यासह काही आमदारांनी 2 जुलैला शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर अजित पवार गटानं बहुमताच्या आधारावर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा सांगितला. हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. या प्रकरणी निवडणूक आयोगासमोर ६ महिने आणि १० सुनावणी पार पडल्या. यानंतर निवडणूक आयोगानं पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करत शरद पवार गटानं 13 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के. वी. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे.

15 फेब्रुवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता आणि पक्षाबाबत निर्णय दिला. तेव्हा अजित पवार आणि शरद पवार गटातील आमदारांना नार्वेकरांनी पात्र ठरवलं. तसेच, विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं होतं.

Sharad Pawar | Ajit Pawar
Aditya Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे 'मातोश्री'वर येऊन रडायचे; आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं

दरम्यान, निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाला अद्याप कुठलंही चिन्ह दिलेलं नाही. त्यामुळे निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाला न्यायालय स्थगिती देतं का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

R

Sharad Pawar | Ajit Pawar
Asaduddin Owaisi Vs Prakash Ambedkar : ओवेसींचा थेट 'बडे भाई'च्या मतदारसंघातूनच एल्गार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com