Vande Bharat Express : 'आयफेल टॉवर'पेक्षाही अधिक उंच पूलावरून धावणार 'वंदे भारत एक्स्प्रेस'

Vande Bharat Express latest News : जाणून घ्या, कोणत्या मार्गावर धावणार ही ट्रेन ; याचबरोबर कन्याकुमीरीपासून ते काश्मीपर्यंतच्या ट्रेनचं स्वप्नही पूर्ण होणार आहे.
VANDE BHARAT EXPRESS
VANDE BHARAT EXPRESSsarkarnama
Published on
Updated on

Kashmir Vande Bharat Express Inauguration : श्री माता वैष्णो देवी(कटरा) स्टेशन ते श्रीनगर या मार्गावरील रेल्वेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर कन्याकुमीरीपासून ते काश्मीपर्यंतच्या ट्रेनचं स्वप्न पूर्ण होईल.

उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशु शेखर उपाध्याय यांनी सांगितले की, उधमपूर-श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे लिंक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यास कटरा आणि श्रीनगर यांच्यातील प्रवासाचा वेळ बराचसा कमी होईल. सद्य परिस्थितीत कटराहून श्रीनगरला जाण्यासाठी सहा ते सात तास लागतात. परंतु नवीन वंदे भारत एक्स्प्रेसमुळे हा प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण होईल.

VANDE BHARAT EXPRESS
Waqf Board Amendment Bill : ''दुरुस्ती विधेयकास जे विरोध करताय ते मुस्लिम नाहीत'' ; उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचं मोठं विधान!

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने(Vande Bharat Express) कटरा-श्रीनगर प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण होईल. तर रस्ते मार्गाने प्रवासाचा वेळ सध्या सहा ते सात तास आहे. सद्यस्थितीस श्रीनगर आणि संगलदान दरम्यान रेल्वेसेवा आहे. संगलदानहून कटरा पर्यंत रेल्वे लाइन सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रवासाला कटरापर्यंत वाढवले जाऊ शकते. यूएसबीआरएल परियोजना काजीगुंड-बारामूल्ला प्रकल्प वर्ष २००९मध्ये सुरू झाला होता.

काश्मीपर्यंत रेल्वे आणण्याचे स्वप्न यूएसबीआरएल परियोजना अंतर्गत पूर्ण झाले आहे. याअंतर्गत काश्मीरपर्यंत रेल्वे विविध टप्प्यात आणली गेली आहे. पहिला टप्पा १८ किलोमीटर लांबीचा बनिहाल-काजीगुंड २०१३मध्ये सुरू झाला, दुसरा टप्पा २५ किलोमीटर लांबीचा उधमपूर-कटरा वर्ष २०१४मध्ये तर तिसरा बनिहाल येथून संगलदान हा वर्ष २०२३मध्ये तसेच आता संगलदानहून कटरा टप्पा सुरू होईल.

VANDE BHARAT EXPRESS
Congress MLA Son Crime : काँग्रेस आमदाराचा मुलगा अन् भावासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल!

पंतप्रधान मोदी(PM Modi) १९ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्यासाठी येतील. ही रेल्वे जम्मूहून कटरा मार्गे श्रीनगरपर्यंतचा प्रवास करेल. केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले की, वंदे भारत ट्रेनच्या उद्धाटनासाठी रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरुपात कटराहून सुरू होईल, कारण जम्मू रेल्वे स्टेशनचे बांधकाम अद्याप सुरू आहे.

हा काश्मीर(Kashmir) घाटीला देशाच्या उर्वरीत भागाशी जोडणारा एक भव्य कार्यक्रम असेल.२३ जानेवारी रोजी भारतीय रेल्वेने श्री माता वैष्णो देवी कटरा रेल्वे स्टेशन येथून श्रीनगर रेल्वे स्टेशनपर्यंत पहिल्या वंदे भारत ट्रेनची ट्रायल रन घेतली होती.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com