Varanasi Lok Sabha Election 2024 Result : सर्वात मोठी बातमी : नरेंद्र मोदींना धक्का; वाराणसीमध्ये पिछाडीवर

Lok Sabha Election Result NDA Vs India Alliance Varanasi Constituency Result : वाराणसी मतदारसंघात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिलेली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

Uttar Pradesh Election 2024 Result : देशातील सर्वाधिक धक्कादायक कल समोर आला आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर पडले आहेत. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या अजय राय यांनी आघाडी घेतली आहे. हा मोदींसाठी धक्का मानला जात आहे.

वाराणसी मतदारसंघ मोदींचा बालेकिल्ला मानला जातो. दरवेळी पहिल्या फेरीपासून मोदी आघाडीवर असतात. पण यावेळी मात्र सुरूवातीच्या फेऱ्यांमध्य मोदी पिछाडीवर पडले आहेत. अजय राय यांना 21 हजार 552 तर मोदींना 19 हजार 924 मते मिळाली आहे. ही पिछाडी केवळ 1628 मतांची असली तरी मोदींसाठी शॉक असल्याचे आता विरोधक मानत आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील सुरूवातीच्या काही फेऱ्यांमधील कल हाती आले असून ‘एनडीए’ने मोठी आघाडी घेतली आहे. मात्र, उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात सुरूवातीच्या कलांमध्ये सकाळी 9.30 पर्यंत समाजवादी पक्षाचे 33 उमेदवार आघाडीवर आहेत.

PM Narendra Modi
Lok Sabha Election 2024 Result : उत्तर प्रदेशात होणार उलटफेर; कमळामागे सायकल सुसाट

उत्तर प्रदेशात भाजपला जमतेम 40 जागांवर आघाडी मिळाली आहे. देशात सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपचा मागील निवडणुकीच्या तुलनेत जागा कमी होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. अखिलेश यादव यांच्या सपाने सर्वांनाच धक्का दिला आहे. काँग्रेसचेही सहा उमेदवारांनी विजयाच्या दिशेने आगेकुच केली आहे.

उत्तर प्रदेशात भाजपला यावेळी 70 हून अधिक जागा मिळतील, असा आशावाद पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. पण सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप मागील निवडणुकीत मिळालेल्या जागांचा आकडाही पार करू शकणार नाही, असे चित्र आहे. बिहारमध्ये मात्र 40 पैकी 30 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे यूपीचे कसर बिहारने भरून काढल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com