Prakash Ambedkar: मोदींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच आंबेडकरांनी डिवचलं; म्हणाले, 'मौत का सौदागर'

Prakash Ambedkar Attacks PM Modi: आंबेडकरांनी यापूर्वी देखील मोदी सरकारच्या धोरणांवर आणि वैदिक हिंदुत्ववादी विचारसरणीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मोदी हे द्वेषी, जातिवादी आहेत, असा घणाघात आंबेडकरांनी केला आहे.
Prakash Ambedkar Narendra Modi
Prakash Ambedkar Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

📝 Summary

  1. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत त्यांना ‘मौत का सौदागर’ म्हटले.

  2. आंबेडकरांनी सनातन धर्माला छळछावणी व अस्पृश्यतेचे प्रतीक ठरवत दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलांना गुलाम बनविण्याची मानसिकता रुजवते असे वक्तव्य केले.

  3. त्यांनी मोदींना द्वेषी आणि जातिवादी म्हटले असून, यापूर्वीही मोदी सरकारच्या धोरणांवर व वैदिक हिंदुत्ववादी विचारसरणीवर सातत्याने टीका केली आहे.

Mumbai news: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आंबेडकर यांनी टि्वट करीत मोदींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच आंबेडकरांनी त्यांना 'मौत का सौदागर' म्हटलं आहे.

“सनातन धर्म हा छळछावणी व अस्पृश्यतेचे दुसरे नाव आहे. तो दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलांना पुन्हा गुलाम बनविण्याची मानसिकता रुजवतो. मोदी हे या व्यवस्थेचे राजा आहेत.” अशा शब्दात आंबेडकरांनी मोदींना डिवचलं आहे.

आंबेडकरांनी यापूर्वी देखील मोदी सरकारच्या धोरणांवर आणि वैदिक हिंदुत्ववादी विचारसरणीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मोदी हे द्वेषी, जातिवादी आहेत, असा घणाघात आंबेडकरांनी केला आहे.

मोदींच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आलेलं हे विधान आणखी राजकीय वादंग पेटविण्याची शक्यता नाकारता येत नाही, “सनातन धर्म हा छळछावणी व अस्पृश्यतेचे दुसरे नाव आहे. तो दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलांना पुन्हा गुलाम बनविण्याची मानसिकता रुजवतो. मोदी हे या व्यवस्थेचे राजा आहेत.” असे आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Prakash Ambedkar Narendra Modi
Maratha Reservation: दोन खासदार वगळता काँग्रेस नेत्यांनी मराठा आंदोलनाकडे फिरवली पाठ!

या विधानामुळे विरोधकांनी मोदींविरोधात आक्रमक सूर लावले आहेत. भाजप नेत्याकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

काही दिवसापूवी आंबेडकरांनी मोदींवर सडकून टीका केली होती. "देशातील विविध पक्षात जे नेते आहेत, ते पक्षीय नेते असून आता देशपातळीवर कोणताही नेता दिसत नाहीये. पक्षाच्या विरोधात देशाला महत्त्व देणारे नेते माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी हे शेवटचे होते, तर त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे नॅशनलिस्ट म्हणून पुढं आले. पण त्यानंतर कोणीही नेता म्हणून पुढं आलेलं नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सनातन हिंदुत्वाचे पंतप्रधान आहेत," असे आंबेडकर म्हणाले होते

Prakash Ambedkar Narendra Modi
Smita Thackeray : उद्धव-राज यांच्या एकत्र येण्यावर ठाकरेंच्या सुनबाईंची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या वाढदिवस आहे, यानिमित्ताने मुंबईत शिवसेने फलक लावले आहेत. बॅनरबाजीमुळे शिवसेनेतील राजकीय गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वांद्रे-वरळी सी लिंक परिसरात लावण्यात आलेल्या या फलकावर पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. मोदींसाठी “जागतिक नेता”, “विकास पुरुष”, “प्रखर राष्ट्रभक्त” अशी विशेषणे वापरण्यात आली आहेत. 2014 पासून मोदींच्या कारकिर्दीचा उल्लेख देखील या याठिकाणी करण्यात आला आहे.

FAQ

Q1: प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना कोणत्या शब्दात संबोधले?
👉 त्यांनी मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हटले.

Q2: आंबेडकरांनी सनातन धर्मावर काय आरोप केला?
👉 तो छळछावणी असून अस्पृश्यता आणि गुलामगिरीची मानसिकता रुजवतो, असा आरोप त्यांनी केला.

Q3: आंबेडकर मोदींवर का टीका करतात?
👉 त्यांना वाटते की मोदी द्वेषी, जातिवादी असून त्यांच्या धोरणांचा परिणाम वंचित समाजावर नकारात्मक होतो.

Q4: आंबेडकरांनी याआधीही मोदींवर टीका केली आहे का?
👉 होय, त्यांनी वारंवार मोदी सरकारच्या धोरणांवर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com