Smita Thackeray : उद्धव-राज यांच्या एकत्र येण्यावर ठाकरेंच्या सुनबाईंची पहिली प्रतिक्रिया

Smita Thackeray on Uddhav Thackeray & Raj Thackeray Unity: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहे. त्यांच्या एकत्र येण्याने राजकारणात याचा किती परिणाम होईल?
Nashik civic polls prediction after Thackeray cousins' reunion
Nashik civic polls prediction after Thackeray cousins' reunionSarkarnama
Published on
Updated on

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार आहे. याबाबत दोन्ही पक्षाकडून सकारात्मक वाटचाल सुरु आहे. अशातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सूनबाई स्मिता ठाकरे यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.

“बाळासाहेब असताना ठाकरे बंधु एकत्र आले असते तर साहेबांना आनंद झाला असता. राज-उद्धव एकत्र आले, याचा कुटुंब म्हणून आनंद आहे” असं स्मिता ठाकरे म्हणाल्या. राजकारणापेक्षा बॉलिवूड वर्तुळात स्मिता ठाकरे हे नाव अधिक चर्चेत असतं. एका मराठी वृत्तवाहिनीसोबत त्या बोलत होत्या.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहे. त्यांच्या एकत्र येण्याने राजकारणात याचा किती परिणाम होईल? यावर त्या म्हणाल्या स्मिता ठाकरे म्हणाल्या, "राजकारणाशी मी संबंधित नाहीय. त्यामुळे या टिप्पणीबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीय,"

काय म्हणाल्या स्मिता ठाकरे

उद्धव-राज दोन्ही बंधु एकत्र आले तर कुटुंबातील कुठल्याही सदस्यालाच आनंदच होणारच. आमचे सासू-सासरे असो किंवा कुठल्याही कुटुंबप्रमुखाला वाटतं की, आपलं कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे. साहेब असते तर त्यांना आनंद झाला असता. बाळासाहेब असताना एकत्र आले असते तर चांगलं झालं असतं. साहेबांना आंनंद झाला असता.

Nashik civic polls prediction after Thackeray cousins' reunion
Shiv Sena Reshuffle Pune: आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेत खांदेपालट! पुणे जिल्ह्यात दोन मोठे फेरबदल

उद्धव-राज एकजूट का महत्त्वाची?

  • उद्धव ठाकरे यांची शिवसेना (यूबीटी)आणि राज ठाकरे यांची मनसे ही दोन्ही पक्षे मराठी अस्मितेवर आधारलेली आहेत.

  • एकेकाळी दोघेही एकत्र होते, मात्र राजकीय मतभेदांमुळे त्यांचे मार्ग वेगळे झाले.

  • महाराष्ट्राच्या आगामी निवडणुका लक्षात घेता, या दोन्ही पक्षांची एकता भाजप आणि महायुतीसाठी मोठं आव्हान ठरू शकते.

ठाकरे कुटुंबाचा प्रभाव

  • बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसा पुढे नेताना ठाकरे कुटुंबातील एकता नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे.

  • स्मिता ठाकरे या जरी सध्या राजकारणात सक्रिय नसल्या तरी समाजकार्य आणि सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सहभाग कायम आहे.

  • त्यांच्या वक्तव्यामुळे आता उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याबाबतचा चर्चेचा सूर आणखी तीव्र झाला आहे.

Nashik civic polls prediction after Thackeray cousins' reunion
Arjun Dangle: दिवस आंदोलन, चळवळीचे! कम्युनिस्ट होणे म्हणजे बरबाद होणे असे समजले जायचे....

पुढील राजकीय समीकरणे

  • जर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले, तर शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावेल.

  • मुंबई, ठाणे, पुणे आणि मराठवाड्यात या एकतेचा राजकीय फायदा होऊ शकतो.

  • भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही एकत्रित ताकद मोठे आव्हान ठरू शकते.

 FAQs

Q1: स्मिता ठाकरे यांनी उद्धव-राज एकत्र येण्यावर काय प्रतिक्रिया दिली?
👉 त्या म्हणाल्या की, कुटुंब म्हणून हा आनंदाचा विषय आहे आणि बाळासाहेब असते तर त्यांना समाधान मिळाले असते.

Q2: स्मिता ठाकरे राजकारणावर भाष्य का करत नाहीत?
👉 त्यांनी सांगितले की त्या राजकारणाशी संबंधित नाहीत.

Q3: उद्धव-राज ठाकरे यांच्या एकतेचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
👉 मुंबई, ठाणे, पुणे व मराठवाड्यात शिवसेना-मनसेची ताकद वाढून भाजप- महायुतीला आव्हान निर्माण होऊ शकते.

Q4: ठाकरे कुटुंबाची एकता का महत्त्वाची मानली जाते?
👉 बाळासाहेबांच्या वारशाशी जोडलेली ही एकता कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवते आणि मराठी अस्मितेचे प्रतीक ठरते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com